ओबीसी एनटी पार्टी आॅफ इडियाच्यावतीने सामाजिक न्यायमंत्र्याच्या निषेध

0
16

भंडारा,दि.31-ओबीसी एनटी पार्टी आॅफ इंडियाच्यावतीने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाला केलेली अपमानास्पद वागणूक आणि ओबीसी समाजाबद्दल काढलेल्या अपशब्दा बदद्ल निषेध नोदविणारे निवेदन आज जिल्हाधिकारी यांच्यामाफेर्त मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.निवेदनात सामाजिक न्यायमंत्र्याचा निषेध नोंदवून विद्यमान सरकारने त्यांना 7 दिवसाच्या आत राजीनामा घेऊन घरी पाठवावे अशी मागणी केली आहे.निवेदन देेतेवेळी जिल्हाध्यक्ष संजय मोहतुरे,पु.शा.निखाडे,अ.म.कांबळे,शालिकराम झंझाड व दुयोधर्न ठाकरे आदी उपस्तित होते.