खासदारांच्या वेतनात होणार 100% वाढ

0
14
नवी दिल्ली – देशातील खासदारांचे वेतन आणि भत्त्यामध्ये 100% वाढ होणार आहे. अर्थमंत्रालयाकडून प्रस्ताव मंजूर झाला असून आता त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्वाक्षरी होईल. मोदींच्या मंजूरीनंतर संसदेच्या पुढील सत्रात त्यासाठीचे विधेयक सादर केले जाईल.
किती वाढणार खासदारांचा पगार 
– विशेष संसदीय समितीने खासदारांचे मासिक वेतन 50 हजारांहून एक लाख रुपये करण्याची शिफारस केली.
– मतदारसंघ भत्यात 45 हजार ते 90 हजार रुपये वाढण्याची शिफारस समितीने केली आहे.
– जर या सर्व शिफारशी मान्यझाल्या तर खासदारांचे वेतन आणि भत्ते दरमहा एक लाख 40 हजारांवरुन दुप्पट अर्थात 2 लाख 80 हजार होईल.
– ज्या समितीने खासदारांच्या वेतनवाढीची शिफारस केली आहे, त्याचे अध्यक्ष भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ आहेत. या समितीने पेन्शनमध्ये ही 75 टक्के वाढीची शिफारस केली आहे.
– त्यासोबतच एका निश्चित काळानंतर वेतनाचा आढावा घेण्याची शिफारस समितीने केली आहे.