उद्या फडकविणार विदर्भाचा ध्वज : अॅड कटरे

0
16
गोंदिया : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीच्या समर्थनार्थ येत्या 1 मे रोजी विदर्भवादी महाराष्ट्रदिन साजरा करणार नसून विदर्भभर काळादिन पाळणार असल्याची घोषणा ज्येष्ठ विदर्भवादी नेते श्रीहरी अणे यांनी नागपूरात तर गोंदिया येथे विदर्भ राज्य समितीचे अध्यक्ष अॅड.टी.बी.कटरे यांनी पत्रकार परिषदेत केली.

पत्रकार परिषदेत माहिती देतांना अॅ़ड कटरे, व पांडे यांनी सांगितले की 1 मे हा विदर्भवासींसाठी काळा दिवस आहे. यानिमित्ताने विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात तसेच तालुक्‍यात काळादिन पाळण्यात येणार आहे. विदर्भाचा ध्वज फडकविला जाईल.गोंदियात गांधी प्रतिमा चौकात विदर्भाचा झेडा फडकविण्यात येणार आहे. नागपुरात विष्णुकी रसोई येथे हा कार्यक्रम होईल. त्याचप्रमाणे व्हेरायटी चौकात भाजपने विदर्भबाबत संमत केलेल्या ठरावाच्या प्रती जाळण्यात येतील. भाजपने विदर्भ राज्य देण्यासंदर्भात भुवनेश्‍वर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ठराव केला होता. या ठरावाची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. या ठरावानुसार भाजप निर्णय घेत नसल्याच्या निषेधार्थ या ठरावाच्या प्रती जाळण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला अॅ़ड राजकुमार बोबांर्डे,अॅड अर्चना नंदागळे,छैलबिहारी अग्रवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.