2.2 मिमी पाऊस पडूनही दुष्काळ नाही-परशुरामकर

0
20


गोंदिया :  खरीप हंगामात धान पिकाचे दाणे भरण्यासाठी ऑक्‍टोबर महिन्यात 200 मिमी पावसाची आवश्‍यकता असते. मात्र, फक्त 2.2 मिमी मीटर पाऊस झाला. सालेकसा, देवरी येथे शून्य पर्जन्यमान आहे. हे वास्तव असतानासुद्धा शासनाने जिल्ह्याला दुष्काळग्रस्त घोषित करू नये, हे आश्‍चर्यकारक आहे. शासन शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहे, असा आरोप जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केला आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भाताचे पीक घेतले जाते. शासनाच्या कृषी विभागानुसार धान पिकाला जून महिन्यात 150 मिमी. नर्सरीसाठी, जुलै महिन्यात 300 मिमी. चिखलणी व पूर्ण लागवडीसाठी 300 मिमी., ऑगस्ट महिन्यात फुटवे अवस्थेत 300 मिमी. सप्टेंबर महिन्यात गर्भावस्ता व लोंबी धरणे 250 मिमी. व ऑक्‍टोबर महिन्यात दाणे भरण्याच्या अवस्थेत 200 मिमी. पावसाची आवश्‍यकता असते. पण, 2015-16 मध्ये जूनमध्ये 221 मिमी., जुलैमध्ये 300 मिमी, ऑगस्टमध्ये 346 मिमी., सप्टेंबरमध्ये 250 मिमी. ज्यावेळी दाणे भरण्याची अवस्था असते त्या महिन्यात 200 मिमी.ची आवश्‍यकता असताना फक्त 2.2 मिमी. पाऊस जिल्ह्यात झाला. यात गोंदिया 2.7, आमगाव 6.7, गोरेगाव 8.1, सडक अर्जुनी 1.3, तिरोडा 0.0, अर्जुनी मोरगाव 0.0, सालेकसा 0.0, देवरी 0.0 असा पाऊस ऑक्‍टोबरमध्ये झाला. नोव्हेंबर महिन्यात 0.0 मिमी पावसाची नोंद आहे. याची टक्केवारी 2.2 मिमी आहे. एकंदरीत धान पिकासाठी 1200 मिमी पावसाची आवश्‍यकता असताना फक्त 1070 मिमी पाऊस पडला. यावरून 230 मिमी. पाऊस कमी पडला. जिल्ह्यातील फक्त 1.9 गावाती पीक पैसेवारी 50 पैशाच्या आत आहे. यात देवरी, सालेकसा, गोरेगाव व आमगाव तालुक्‍यात 109 गावांचा समावेश आहे. 2014-15 मध्ये सरासरी उत्पादन 3781 किलो असताना हेच उत्पादन 2015-16 मध्ये 2961 किलो आले. 82 किलोने कमी आहे. हे सर्व स्पष्ट असतानाही जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित होऊन शेतकऱ्यांना फायदा मिळू नये, ही एक शोकांतिका आहे