वैनगंगेतून अधिकाऱ्यांच्या संगनमताने अदानीची पाण्याची उचल

0
14
गोंदिया-राज्यात पाण्याची भीषण टंचाई असताना पुन्हा एकदा एका बड्या उद्योग समुहाकडून नदी पत्रातून पाणी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर धापेवाडा उपसासिंचन योजना बनविण्यात आली आहे आणि याच योजनेच्या माध्यमातून तिरोडा तालुक्यात उभारण्यात आलेल्या अदानी पॉवर प्लांटला पाणी पुरविण्यात येते. मात्र धरणाची पाण्याची पातळी खालावल्याने २४ एप्रिल २०१६ पासून अदानी पॉवर प्लांटचा पाणी पुरवठा कागदो पत्री जरी बंद करण्यात आला असला तरी अधिकाऱ्यांच्या संगनमताने  पाण्याची उचल करण्यात येत आहे.
तिरोडा तालुक्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर धापेवाडा उपसासिंचन योजना बनविण्यात आली असून या योजनेच्या माध्यमातून तिरोडा तालुक्यातील शेतकऱ्यांना धापेवाडा उपसा सिंचन टप्पा १ च्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो तर याच धरणावर अदानी उद्योग समुहाने पंप हाउस तयार केला असून वर्षाला ७० एमएमक्यु पाणी अदानी पॉवर प्लांटला दिले जाते.
 एप्रिल महिन्यात धरणात १० एमएमक्यू पाणी शिल्लक होते. मात्र सद्य परिस्थितीत ३ एमएमक्यू पाणी शिल्लक असल्याने उर्वरित पाणी गेले कुठे, असे प्रश्न शेतकरी विचारत आहेत. २३ एप्रिल २०१६ ला धरणात ३ एमएमक्यू पाणी शिल्लक असल्याने २.५ एमएमक्यू पाणी २२ जलपूर्ती योजनेकरिता राखीव ठेवायचं आहे. तर उर्वरित ५ एमएमक्यू पाणी शेतकऱ्यांना देण्यासाठी राखीव ठेवले असल्याचे अधिकारी सांगत आहेत. मात्र धरणात ३ एमएमक्यू पाणी शिल्लक असताना अदानी समूह पाण्याची उचल कशी करतो, असा प्रश्न निर्माण होत आहे. तर अधिकारी सांगतात की, अदानी पॉवर प्लांटला २४ एप्रिल २०१६ पासून नदी पत्रातून पाणी उचल करण्यात बंदी करण्यात आली आहे, मात्र  धापेवाडा उपसा सिंचन योजनेवर अदानी समुहाकडून बांधण्यात आलेल्या पंप हाउसची पाहणी केली असता नदी पत्रातून पाण्याची उचल करण्याची बंदी असताना सुधा पाण्याची उचल करत असल्याचे निदर्शनास आले.