मंत्र्याने स्मशानभूमीत घालवली अख्खी रात्र

0
8

बेळगाव (कर्नाटक)- कर्नाटकचे उत्पादनशुल्कमंत्री सतीश जर्कीहोली यांनी अंधश्रद्धेविरोधात शनिवारी अख्खी रात्र स्मशानभूमीत घालवली. अंधश्रद्धेविरोधात जागरुकता दाखवून सतीश जर्कीहोली यांनी समाजाला एक दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. जर्कीहोली सध्या राज्यात अंधश्रद्धेविरोधात जनजागृती करत आहेत. राज्य विधानसभे‍त अंधश्रद्धाविरोधी विधेयक आणण्याचा जर्कीहोली यांचा मानस आहे.

जगातील सगळ्यात श्रीमंत असलेले बिल गेट्स यांनी कधी लक्ष्मीचे पूजन केले नाही. तरी देखील ते श्रीमंत आहेत. तसेच जर्कीहोली यांनीही कधी लक्ष्मीचे पूजन केले नाही. तरी वर्षाकाठी ते 600 कोटी रुपयांचा बिझनेस करतात, असे जर्कीहोली यांनी सांगितले.

सतीश जर्कीहोली यांच्यासोबत त्यांचे हजारो समर्थकही होते. स्मशानभूमीत सगळ्यांनी भोजन केले. विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनही केले. स्मशानभूमीत भूत-पिछाच्छ असतात, असा सर्वसामान्य व्यक्तीचा समज असतो. मात्र, स्मशानभूमीत भूते नसतात. तर व्यक्तीच्या मना तशी भीती निर्माण केलेली असते. स्मशानभूमी एक पवित्र स्थळ असल्याचेही मंत्री जर्कीहोली यांनी म्हटले.