1009 धावा करुनही ऑटोवाल्याच्या मुलाऐवजी सचिनच्या मुलाचे सिलेक्शन

0
23
मुंबई-1009 धावा करुनही प्रणव धनवडेला फक्त तो आॅटोवाल्याचा मुलगा असल्याचा फटका अंडर -16 क्रिकेट संघ निवडतांना बसला आणि पु्न्हा काही सेकंदात जसा भारतरत्न पुरस्कार सचिन तेंडुलकरला देण्यासाठी घाई करण्यात आली.तीच परिस्थिती या संघात खेळाडू निवडतांना सचिनच्या मुलगा अर्जुन तेंडुलकरसाठी करण्यात आली.अर्जुनच्या खेळात काहीही नसताना वेस्ट झोन अंडर-16 क्रिकेट संघात निवड झाली आहे. हुबळी येथे होणाऱ्या इंटर झोनल टूर्नामेंटमध्ये हा संघही सहभागी होणार आहे. मात्र या टुर्नामेंटसाठी अर्जुनच्या निवडीपेक्षाही चर्चा आहे ती, प्रणव धनावडेची निवड न झाल्याची. आपल्याला माहितच असेल की, प्रणवने जानेवारी महिन्यात शालेय स्थरावरील एका क्रिकेट सामन्यात 1009 धावांची तुफानी खेळी केली होती.तेव्हा खुद्द सचिनने त्याला आपली बॅट दिली होती.प्रणववर झालेल्या अन्यायनंतर पुन्हा कपिल देव यांचे ते बोल आठवतात त्यांनी म्हटले होते की सचिन पेक्षा विनोद कांबळी चांगला होता परंतु त्याला संघात स्थान मिळाले नाही,तशीच परिस्थीती प्रणवची ठरली आहे.
प्रणवचे वडील प्रशांत धनावडे यांनी प्रणवला वयाच्या सहाव्या वर्षापासूनच मैदानात उतरवले. 15 वर्षीय प्रणव आता दहावीत आहे. प्रणवला क्रिकेटपट्टू बनविण्याचे स्वप्न पाहिलेल्या त्याच्या कुटुंबियांना आता त्याला मुंबईकडून खेळताना पाहायचे आहे. इतर क्रिकेटपट्टूप्रमाणेच प्रणवचे देशासाठी खेळण्याचे स्वप्न आहे. यासाठी प्रणव मोठी मेहनत घेत आहे तर त्याचे प्रशिक्षक मोबिन शेख त्याला घडविण्याचे काम करीत आहेत.