28 किमीच्या विस्तीर्ण परिसरात पुलगावची आॅर्डनस फॅक्ट्ररी

0
19

विशेष प्रतिनिधी

पुलगाव(वर्धा),दि.31 – वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील सीएडी (CAD) म्हणजेच सेन्ट्रल अम्युनिषन डेपो हा भारतीय लष्कराचा देशातील सर्वात मोठा डेपो आहे. आशिया खंडात या डेपोचा दुसरा क्रमांक लागतो.वर्धेा जिल्हा मुख्य़ालय़ापासून  ४० किलोमीटर अंतरावरील पुलगाव मध्ये २८ किलोमीटरच्या विस्तीर्ण परिसर आहे. पुलगाव हे मुंबई – कलकत्ता रेल्वेमार्गावर सुध्दा आहे. येथील ओर्डीनंस फॅक्टरी मध्ये शस्त्रे बनवन्यासह दारूगोळ्याच्या साठाही ठेवण्यात येतो.दारुगोळा साठवण्याचे बंकर ५ किलोमीटरच्या परिसरात आहेत. बंदुकीच्या गोळी पासून एके-४७ आणि ब्रम्होस मिसाईलचा शस्त्रसाठा येथे ठेवण्यात येतो.येथील सर्व यंत्रणा ही केंद्रसरकारच्या सरक्षण मंत्रालयातंर्गत येते.या परिसरात कुणालाही प्रवेश नाही.लष्करी जवान ते सुध्दा त्याठिकाणी कार्यरत असतील त्यांनाच प्रवेश दिला जातो.या घटनेने देशाची सुरक्षा यंत्रणाच धोक्यात आली आहे.हा येथील स्पोट कशामुळे झाला याचा तपास करण्यास सरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ दाखल होण्यास सुरवात झाली आहे.

विदर्भातील नागपूर, भंडारा आणि इतर ठिकाणच्या ओर्डीनंस फॅक्टरीमधून येणारा दारुगोळा या ठिकाणी साठवण्यात येतो. बंकर बनवून तिथे हा शस्त्रसाठा ठेवण्यात येतो.एका बंकर मध्ये ५ ते ६ हजार किलो शस्त्रसाठा असतो.या बंकरच्या सुरक्षेसाठी २४ तास डीएससी (डिफेंस सेक्युरिटी कॉर्प) चे जवान तैनात असतात. बंकर्सना काटेरी कुंपण असत. या बंकर्स बाहेर झाडे-झुडपी वाढलेली असतात. उन्हाळ्याचे दिवस असल्याने या झुडपांवर एखादी ठिणगी पडून आग लागण्याची शक्यता तज्ञानी व्यक्त केली आहे. सोमवारी मध्यरात्री  आग नेमकी कोणत्या बंकरला लागली,आगीचे नेमके कारण काय आणि त्या बंकरची सुरक्षा व्यवस्था कशी होती याची माहिती चौकशी झाल्यावरच समोर येईल.