आज एसटीच्या वर्धापनदिनी कर्मचार्यांचा गौरव

0
16
गोंदिया : १ जून रोजी राज्य परिवहन महामंडळाचा ६८ वा वर्धापन दिन आहे. दरम्यान या दिवशी राज्यातील विभागीय कार्यालय आगार व बसस्थानकात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सुचना एसटी विभागाने दिल्या आहेत. त्यानुसार गोंदिया येथील आगारात वर्धापन दिन थाटात साजरा केला जाणार असून उत्कृष्ठ कामगिरी करणाNया कर्मचाNयांचा गुणगौरव केला जाईल, अशी माहिती आगार व्यवस्थापक गौतम शेंडे यांनी दिली आहे.
१ जून १९४८ रोजी जन्मास आलेल्या एसटी महामंडळाने मागील ६८ वर्षात संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. आजमितीश एसटी महामंडळाकडे १७ हजार ५०० गाड्या आहेत. गोंदिया आगारात ८४ बसेस आहेत. संपूर्ण राज्यात १ लाख ५ हजार कर्मचाNयांना एसटीने रोजगार दिला आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचल्यास एसटीला चांगले उत्पन्न मिळू शकते ही बाब लक्षात घेवून विविध कार्यक्रमांनी वर्धापनदिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  पोलीस उपअधिक्षक सुरेश भवर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, आगार व्यवस्थापक गौतम शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य शिबीर, प्रवाशांचे स्वागत, शहनाई वादन, आगाराची रंगरंगोटी आणि कार्यक्रमाचे उद्घाटन असे भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहे. एसटीचे उत्पन्न वाढविणारे तथा डिजल बचत करणाNया एसटी कर्मचाNयांसह उत्कृष्ठ कामगिरी करणाNया कर्मचाNयांचा गौरव करण्यात येईल. या कार्यक्रमाला प्रवाशांनी उपस्थित रहावे तथा सुरक्षेच्या हेतूने प्रवाशांनी खासगी वाहतुकीपेक्षा एसटीने सुरक्षीत प्रवास करावा असे आवाहन आगार व्यवस्थापक शेंडे यांनी केले आहे.