मल्ल्यांविरोधात कारवाईला सुरुवात

0
15
मुंबई, दि. 11 – बँकांचे जवळपास 9000 कोटी रुपयांचे कर्ज बूडवून पसार झालेल्या विजय मल्ल्यांविरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) कारवाईला सुरुवात केली आहे. आयडीबीयच्या  900 कोटी कर्ज घोटाळ्यासंबंधी तपास करत असलेल्या ईडीने विजय मल्ल्यांची 1411 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. विशेष म्हणजे  ईडी सध्या फक्त आयडीबीयच्या  900 कोटी कर्ज घोटाळ्यासंबंधी तपास करत आहे. इतर तपासयंत्रणांशी चर्चा केल्यानंतर 17 बँकांच्या थकलेल्या 9000 कोटी कर्जासंबंधीही तपास केला जाण्याची शक्यता आहे.
मनी लाँड्रिंगच्या आरोपाचा सामना करीत असलेले मद्यसम्राट विजय मल्या यांना हद्दपार करून भारतात पाठविण्यास ब्रिटनने स्पष्ट नकार दिल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मल्यांना रेड कॉर्नर नोटिस पाठवण्यासाठी इंटरपोलकडे विनंती केली होती.