संरक्षणमंत्र्यांकडून जम्मू-काश्मीरचा आढावा

0
6

श्रीनगर- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी येथील सुरक्षिततेच्या स्थितीचा आज (गुरुवारी) आढावा घेतला. अलीकडे उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अकरा सुरक्षा जवान हुतात्मा झाले होते.

पर्रीकर येथे आल्यानंतर त्यांना लष्कराच्या उत्तर विभागाचे कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल डी.एस. हुडा यांनी राज्यातील सुरक्षा व्यवस्थेची माहिती दिली.

‘सीमा भाग, प्रत्यक्ष ताबारेषेलगतच्या भागात उदभवणाऱ्या परिस्थितीबद्दल, तसेच लष्कराच्या कारवायाबाबत संरक्षणमंत्र्यांना माहिती देण्यात आली,‘ असे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.

लष्कराच्या १५ कॉर्प्सचे लेफ्टनंट जनरल सुब्रता साहा यांनीही काश्मीर खोऱ्यातील कारवाया, विशेषतः ५ डिसेंबर रोजीची उरी येथील कारवाई आणि २ डिसेंबर रोजी नौगाव येथे हाणून पाडलेला घुसखोरीचा कट याबाबत माहिती दिली.