पाच हजार एक्स्प्रेसमध्ये सुरक्षा होणार कडक

0
7

नवी दिल्ली- रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने ५००० एक्स्प्रेसमध्ये सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. या सुरक्षा दलाच्या सैनिकांना मोबाईल फोनबरोबरच काही महत्त्वाची साधने पुरवली जाणार आहे.
देशात रोज रेल्वेतर्फे ११ हजार एक्स्प्रेस व पॅसेंजर चालवल्या जातात. त्यापैकी १३०० एक्स्प्रेसना सुरक्षा पुरवली जाते. आता पाच हजार एक्स्प्रेसमध्ये सुरक्षा देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे, अशी माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक कृष्णा चौधरी यांनी दिली.
आम्ही १६,५०० जवानांच्या भरतीचे काम सध्या सुरू आहे. ते एप्रिलपर्यंत पूर्ण होणार आहे. सर्वसाधारणपणे एक्स्प्रेसमध्ये सहा ते सात जवान तैनात केलेले असतात. मात्र, माओवादी भागातून जाणा-या एक्स्प्रेसमध्ये २० जवान तैनात केले जातात.
आता प्रत्येक आरपीएफच्या जवानाला मोबाईल फोन दिला जाणार आहे. तो मोबाईल क्रमांक संबंधित एक्स्प्रेससाठीच असेल. हे क्रमांक सिरिजमध्ये द्यावेत, अशी मागणी मोबाईल कंपन्यांनी केली आहे. त्याचबरोबर एक्स्प्रेसमधील सुरक्षा जवानांच्या प्रमुखपदी उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी असेल, असेही ते म्हणाले.