दिव्यांग मुलांनी केली उत्कृष्ठ साहित्य निर्मिती

0
11

गोंदिया,दि.29-गोंदिया जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत येत असलेल्या अपंग समावेशित शिक्षण विभागाच्यावतीने जिल्ह्यातील दिव्यांग मुलांना चांगले शिक्षण उपलब्ध करुन देऊन त्यांच्यातील कलात्मक बाबींचा हेरुन त्यांच्याकडून तयार केलेल्या साहित्याची प्रदर्शनी जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीत आयोजित करण्यात आली होती.या दिव्यांग मुलांद्वारे निर्मित साहित्य प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषा मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपाध्यक्ष रचना गहाणे,शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी.कटरे,माजी अर्थ व बांधकाम सभापती प्रकाश गहाणे यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.चंद्रकांत पुलकुंडवार,शिक्षणाधिकारी उल्हास नरड,उपशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य विश्वजीत डोंगरे आदी उपस्थित होते.अपंग समावेशित शिक्षण विभागाचे प्रमुख विजय ठोकणे यांनी मुलांनी तयार केलेल्या साहित्याची माहिती उपस्थितांना दिली.या प्रदर्शनाची दखल शासनाच्या शिक्षण विभागाच्या बालचित्रवाणीच्या चमुने सुध्दा घेतली.त्यांनी या प्रदर्शनाचे चित्रिकरण मुकाअ पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत केले.