40 उपजिल्हाधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी पदोन्नती

0
27

मुंबई – राज्यातील 40 उपजिल्हाधिकाऱ्यांना महसूल विभागाने नुकतीच अपर जिल्हाधिकारी पदी बढती दिली आहे. या अधिकाऱ्यांच्या बढतीमुळे विदर्भ, मराठवाडा आदी महसूल विभागांतील या दर्जांची रिक्‍त पदे भरली जाणार असून, या पदोन्नतीमुळे विभागीय महसूल कार्यालये गतिमान होणार आहेत.

उप जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातून अपर जिल्हाधिकारी पदी पदोन्नती देताना 1996 ते 2001 या तुकडीमधील 40 अधिकाऱ्यांचा विचार करण्यात आला आहे. यामध्ये खुला, इतर मागास वर्ग, भटक्‍या जमाती, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्‍त जाती आदी प्रवर्गांतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. साधारणतः उपजिल्हाधिकारी पदासाठी निवड झाल्यानंतर 12 ते 14 वर्षे इतक्‍या कालावधीत अपर जिल्हाधिकारी पदी पदोन्नती मिळते. मात्र या 40 अधिकाऱ्यांना सुमारे 19 वर्षांच्या कालावधीनंतर पदोन्नती मिळाली आहे.