शाळेत निरागस मुलींवर अत्याचार,पालक संतप्त

0
16

यवतमाळ,दि.30-शिक्षकाच्या पवित्र कार्याला काळिमा लावणारी घटना बुधवारला(दि.29)शहरातील जवाहरलाल दर्डा एज्यूकेशन सोसायटी संचालित यवतमाळ पब्लिक स्कूल शाळेतील दोन शिक्षकांनी केल्याचे समोर आले.या प्रकरणात दोन शिक्षक यश बोरुदिया आणि अमोल क्षिरसागर यांना पोलिसांनी अटक केली आहे.याघटने मुळे मुलांच्या पालकामध्ये संतप्त वातावरण आहे,काल पालक आणि सामाजिक संघटनांनी यवतमाळ पब्लिक स्कूल समोर आपला संताप व्यक्त केला,यावेळी दर्डा यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.आज या घटनेच्या विरोधात यवतमाळ शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले.तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.सुरुवातीला ही माहिती पालकांनी संस्थेचे किशोर दर्डा यांना सांगितली. त्यांनी पालकांना समजावण्याचा प्रयत्न केला पण लागलीच हे निंदनीय कृत्य शहरभरात पसरले,अशा प्रकारच्या नावाजलेल्या शाळेतील शिक्षक असे काळे कारनामे करत असतील तर संस्थेच्या प्रशासनाचा आपल्या कर्मचा-यावर वचक नाही का असा सवाल यावेळी पालकांनी व्यक्त केला.