“कमर्शिअल पायलट‘ होणारी हर्षा ठरली एकमेव महिला वैमानिक

0
12

जळगाव,दि.17- वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी “एअर इंडिया‘मध्ये “कमर्शिअल पायलट‘ म्हणून रुजू झालेल्या चाळीसगावच्या हर्षा महाले (राजपूत) हिने गगन भरारी घेऊन चाळीसगावच्या लौकिकात भर घातली आहे. विशेष म्हणजे, 21 व्या वर्षी “कमर्शिअल पायलट‘ होणारी हर्षा ही भारतातील एकमेव महिला वैमानिक ठरली आहे.हर्षा महाले हिची “एअर बस 302‘ची सीनिअर पायलट म्हणून नुकतीच नियुक्ती झाली आहे. या पदासाठी भारतातून जवळपास 550 उमेदवारांचे अर्ज आले होते. त्यातून हर्षा ही राजपूत समाजातील पहिली व एकमेव महिला पायलट ठरली आहे.

खडकीसीम (ता. चाळीसगाव) येथील रहिवासी पशुवैद्यकीय विभागातील निवृत्त उपायुक्त डॉ. अमरसिंग महाले यांची कन्या असलेल्या हर्षाने लहानपणीच विमान चालविण्याचे स्वप्न बाळगले होते.हर्षा महालेची कमर्शिअल पायलट म्हणून नियुक्ती झाल्याचे समजताच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील, प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंग ठाकूर, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक व उद्योजक सरकारसाहेब रावल आदींनी तिचा ठाण्यात नुकताच गौरव केला.