जिल्हाधिकार्यानी केली धान पीक लागवडीची पाहणी

0
30

पाहणी दौर्यात मात्र जिल्हाधिकार्यांनी टाळले पत्रकारांना

गोंदिया,दि.31 :- धान उत्पादक जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्यात दर वर्षी १९०००० हजार हेकट शेतजमिनीत धान पिकाची लागवड केली जाते .मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या काडत पीक लागवडीत सुधारणा होत असलयाचे चित्र यावर्षी गोंदियात पाहायला मिळत आहे .जिल्यातील एकूण धान पीक लागवड क्षेत्रा पैकी ४५ % शेत जमिनीवर यावर्षी श्री पद्धतीने तसे मॉडिफाय पद्धतीने धान पिकांची रोवनी करण्यात आली.या धान पिकाच्या रोवणीची पाहणी जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी नुकतीच केली.
जिल्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी श्री पद्धतीने किंवा मॉडिफाय पद्धतीने कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन धान पिकांची लागवड करण्याचे आव्हान केले आहे .त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर पडेल .पारंपरिक पद्धतीने धान पिकाची लागवड करण्या करीत एकरी २० ते २५ किलो बिजाई लागते तर श्री पद्धतीने किंवा मॉडिफाय पद्धतीने धान पिकांची लागवड केल्यास ३ किलो बिजाई लागते . त्यामुळे बीज खर्च देखील कमी येतो आणि उत्पादन देखील जास्त येते .श्री पद्धतीने लागवड करायची असल्यास १० ते १५ दिवसाची रोपटे २५ बॉय २५ सेंटी मीटर वर लावावी लागतात त्यामुळे अंतर जास्त असल्याने धान पिकाची वाढ आणि उत्पादन क्षमता वाढते जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक लागवड पद्धतीत बदल करून धान पिकाची लागवड करण्याचे आव्हाहं कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे
ही पाहणी करतांना जिल्हास्थळावरील पत्रकारांनाही सोबत घेऊन गेले असते तर अजून धान पिकाच्या लागवडीची माहिती व परिस्थिती पत्रकारांना या धान पीक लागवडीची पाहणी सोबतच कृषी विभागाच्या कामाचीही पाहणी करता आली असती परंतु कुणास ठाऊक गेल्या एक दोन वर्षापासून जिल्हाधिकारी महोदय पत्रकारांना सोबत नेण्याएैवजी इतरांना सोबत घेऊन जात असल्याने पत्रकारांनी वास्तविकता बघू नये अशी तर भूमिका नसावी ना अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.
विकासासाठी जेवढे अधिकारी महत्वाचे असतात तेवढीच भूमिका ही प्रसारमाध्यमांची असते परंतु काही लोक जाणिवपुर्वक अधिकारी वर्गाला आपल्या हितासाठी पत्रकारांबद्दल चुकीची माहिीत देऊन त्यांना या विकासात्मक घडामोडीत अधिकारीपासून दूर ठेवण्यात नारदाची भूमिका तर बजावत नाही ना अशा ही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.