संत नामदेव महाराज शोभायात्रेचे स्वागत

0
15

गोंदिया – वैष्णव शिंपी समाज व संत नामदेव महाराज सेवा समिती तर्फे आज(३१ जुलै) रोजी संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरात त्यांच्या पालखीसह भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. विठ्ठल रुख्माई मंदिरातून निघालेल्या या शोभायात्रेचे भारतीय जनता पार्टी तर्फे गांधी प्रतिमा चौक येथे स्वागत करण्यात आले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माल्यार्पण करून पालखीचे पूजन केले. तसेच शोभायात्रेत सहभागी भाविकांना आइस्क्रीम चे वितरण करण्यात आले. या प्रसंगी प्रामुख्याने संजय कुलकर्णी, झोनल रेल्वे कमेटी सदस्य महेश आहुजा, मनोहर आसवानी, शहर महामंत्री बाबा बिसेन,धर्मेंद्र डोहरे, चंद्रभान तरोणे, राजा कदम, कुशल अग्रवाल, संजय मुरकुटे, नगरसेवक महेंद्र उके, भाजयुमो जिल्हा महामंत्री पंकज सोनवाने, छोटू रामटेककर, रोहित अग्रवाल, अहमद मणियार, हरीश आसवानी, अजय लौंगाणी, विनोद बन्सोडे, रोशन मंगतानी, होतंचंद छताणी, अतुल फेंडारकर, दुर्गेश भिवगडे, शैलेश भिवगडे, प्रशांत बेलगे, धीरज मोटवानी, बबलू भुम्बर अनिल मोटवानी, मुकेश सचदेव आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.