रोहयोतर्गंत सर्वाधिक काम देणारी ग्रा.प.ठरली टोयागोंदी

0
15

सालेकसा,दि.4:- महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत सर्वाधीक मनुष्यदिन निर्मिती करीत नागपूर विभागात रोजगार उपलब्ध करुन देण्याचा पहिला बहुमान नक्षलग्रस्त सालेकसा तालुक्यातील टोयागोंदी या ग्रामपंचायतीने पटकावला आहे.या ग्रामपंचायतीचा मान सन्मान 29 जुर्ले रोजी मुंबई येथे एका कार्यक्रमात राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आला.
वर्ष २0१५-१६ या कालावधीत रोजगार हमी योजनेंत टोयागोंदी ग्रामपंचायतीने नागपूर विभागात सर्वाधीक मनुष्यदिन निर्मिती केली.याबद्दल राज्याच्या नियोजन विभागाकडून ( रोजगार हमी योजना ) २९ जुलै ला मुंबई येथे रोजगार व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते टोयागोंदीचे सरपंच लिल्हारे व सचिव मेश्राम यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.त्यामुळे आदिवासी नक्षलग्रस्त तालुक्यात रोजगाराची कामे आधीच कमी असतानाही आदिवासी लोकांना एवढ्या मोठ्या प्रमाणात रोजगार देऊन गावातील रस्ते, नाल्या, शेततळे, जलाशयाची दुरुस्ती करून गावाचा विकास साधला.
विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे मुकाअ डाॅ.चंद्रकांत पुलकुंडवार,उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे,रोहयो उपमुकाअ भांडारकर यांनी सातत्याने रोहयो योजनेतून अधिकाधिक कामे ग्रामपंचायत मार्पेत करुन स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे निर्देश स्थानिक पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांना दिले होते.