कामाख्या व पुणेदरम्यान साप्ताहिक सुविधा स्पेशल ट्रेन

0
15

गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेद्वारे प्रवाशांनी गर्दी लक्षात घेवून प्रवाशांना अधिकाधिक रेल्वे सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कामाख्या-पुणे-कामाख्यादरम्यान साप्ताहिक सुविधा स्पेशनल ट्रेन (८२५0६/८२५0५) चालविण्यात येणार आहे.
गाडी क्रमांक (८२५0६) कामाख्या-पुणे स्पेशल कामाख्यावरून ३ ऑक्टोबर २0१६ ते १४ नोव्हेंबर २0१६ पर्यंत प्रत्येक सोमवारी (ऑक्टो-३, १0, १७, २४, ३१ व नोव्हें-७ व १४) रात्री ११ वाजता सुटेल व गुरूवारी रात्री २.४५ वाजता पोहोचेल. तसेच गाडी क्रमांक (८२५0५) पुणे-कामाख्या स्पेशल पुणेवरून ६ ऑक्टोबर २0१६ ते १७ नोव्हेंबर २0१६ पर्यंत (ऑक्टो-६, १३, २0, २७ व नोव्हें-३, १0, १७) प्रत्येक गुरूवारी सुटेल व शनिवारी दुपारी ३.२५ वाजता कामाख्या पोहोचेल.
गाडी क्रमांक (८२५0६) चे नागपूर आगमन बुधवारी (सकाळी ११.१५ वाजता) व प्रस्थान ११.२५ वाजता तसेच गाडी क्रमांक (८२५0५) चे नागपूर आगमन शुक्रवार (दुपारी १.२0 वाजता) व प्रस्थान (दुपारी १.३0 वाजता) होईल.
ही स्पेशल गाडी प्रामुख्याने न्यूजपाईपगुडी, आसनसोल, चक्रधरपूर, राऊरकेला, झारसुकडा, बिलासपूर, रायपूर, दुर्ग, गोंदिया, नागपूर स्थानकांवर थांबेल.या गाडीत दोन एसएलआर, 0८ स्लिपर व 0२ तृतीय श्रेणी वातानुकूलित, 0१ द्वितीय श्रेणी वातानुकूलित कोच व 0१ सामान्य कोचचा समावेश राहील.