संघी टॉपर्स अवार्डचे वितरण

0
20

आमगाव दि. 3१: क्रीडा भारती गोंदिया जिल्हा द्वारे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त स्थानिक लक्ष्मणराव मानकर अध्यापक विद्यालय येथे राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार आणि वर्ग दहावी व बारावीमध्ये जिल्ह्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा संघी टॉपर्स अवार्ड देऊन सत्कार करण्यात आला.
प्राचार्य डॉ. दिलीप संघी यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार साहेबराव राठोड, नायब तहसीलदार पवार, पोलीस निरीक्षक सचिन सांडमोर, क्रीडा अधिकारी अनिल निमगडे, डी.एस. भारसाकळे, प्रा. जयंत बन्सोड यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले.
सर्वप्रथम अतिथींनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. प्रांतमंत्री विनायक अंजनकर यांनी क्रीडा भारतीच्या कार्याचे विवेचन केले. अतिथींनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनकार्यावर विचार व्यक्त केले. खेळाडूंनी अधिक यश प्राप्त करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी वर्ग १२मध्ये जिल्ह्यात प्रथम किशोर काळबांधे व वर्ग १0 वीमध्ये जिल्ह्यात प्रथम चंचल अग्रवाल, राष्ट्रीय स्पर्धेत गोंदियाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू काजल चंदनबटये, प्रियंका बैस, शीतल शक्तीकर, जान्हवी रंगनाथन, राशी शेंडे, तनुश्री गौतम, अंजली टहल्यानी, सुमीरन चहाण, अंजली उके, यश तिवारी, तोपेश सावरकर, कुणाल तांडेकर, अभिषेक झॉ, प्रणय नंदागवली, किशोर राऊत यांचा रोख पुरस्कार व सिल्व्हर मेडल देऊन सत्कार करण्यात आला.
खेळाडूंना स्व.डी. सत्यनारायण संघी यांच्या स्मृतीत डॉ. दिलीप संघी व परिवारतर्फे २0 हजार रुपयांचे पुरस्कार व सिल्व्हर मेडल देण्यात आले.
याप्रसंगी जिल्ह्यातील क्रीडा प्रशिक्षक, शिक्षक, खेळाडूंचे पालक व मोठय़ा संख्येत विद्यार्थी उपस्थित होते.