अवयवदान – काळाची गरज

0
250

गोंदिया,दि ३१ आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे मानवाचे आर्युमान उत्तरोत्तर वाढतच चालले आहे. विविध व्यक्तीवर परिणामकारक उपाययोजना अस्तित्वात असली तरी एक अवयव निकामी झाल्यास दुसरा अवयव प्रत्यारोपण करण्याव्यतिरिक्त दुसरा उपाय नाही, व तो अवयव उपलब्ध न झाल्यामुळे रुग्ण प्राणाला मुकतात.देशभरातील अवयवदानाचे प्रमाण अजूनही १० लाख लोकसंख्येमागे केवळ ०.५ टक्के इतकेच आहे. वर्षभरात देशामध्ये तब्बल दोन ते अडीच लाख किडनीची गरज असतांना केवळ ७ हजार किडनीचे प्रत्यारोपण होत आहे. ५० हजार हृदयाची गरज असतांना केवळ ५० ते ६० हृदयांचे प्रत्यारोपण होत आहे. ५ हजार यकृतांची गरज असतांना १०० ते २०० यकृत मोठया मुश्किलीने प्रत्यारोपण होत आहेत ही आजची वस्तुस्थिती आहे.
त्यामुळेच अवयवदानाच्या जनजागृतीसाठी महाराष्ट्र सरकार ने तीन दिवस महा अवयवदान अभियान व्यापकपणे राबविण्याचा संकल्प केला आहे. या अभियानातून इच्छुक दात्यांचा ङ्कडाटाङ्क तयार होणार आहे. डाटामुळे अवयवदानाचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे.अजूनही अवयवदानाबाबत खूप कमी माहिती देशवासियांना आहे. १.४ लाख लोकांचा दरवर्षी रस्ते अपघातामध्ये मृत्यू होतो. या सर्व लोकांकडून अवयवदान झाले तर किडनीसह इतर बहुतेक अवयवांची देशभरातील गरज पूर्ण होऊ शकते. अमेरिका,ब्रिटन,जर्मनी, नेदरलॅड मध्ये कुटुंबाच्या संमतीव्दारे अवयवदानाची पध्दत आहे.
सिंगापूर,बेल्जीयम,स्पेनमध्ये व्यक्तीने जिवंतपणी अवयवदानास नकार न दिल्यास व्यक्तीची मरणोत्तर अवयवदान संमती गृहीत धरली जाते. तसे पाहिले तर भारतात बहुतांश व्यक्ती जिवंतपणी दानधर्म, देवधर्म, तप-तपस्या या मरणोत्तर आत्मशांती व अमरत्व प्राप्तीसाठी करतात पण अवयवदान हे मानवाच्या इतिहासातील अमरत्वाकडे जाणा-या वाटचालीतील पहिले पाऊल आहे. अवयवदाता अवयवदान रुपाने इहलोकी निवास करतो.
एवढेच नाही तर बहुविध जाती धर्माच्या समाजाला अवयवांच्या देवाण घेवाणघेवाणीतून एकत्र बांधणारे अवयवदान हे सूत्र मानवाच्या हाती लाभले आहे.पूर्वीच्या काळात सुरुवातीला रक्तदानासाठी दाते स्वइच्छेने समोर पुढाकार घेत नव्हते पण काळाच्या ओघात रक्तदान सर्व सामान्य झाले आहे. कुठलाही निरोगी सुदृढ व्यक्ती जिवंतपणीच एक मुत्रपिंड, लिव्हरचा काही भाग, फुप्फुसाचा काही भाग, आतडयांचा काही भाग, स्वादुपिंडाचा काही भाग अवयवदानाव्दारे दुस-या गरजू व्यक्तीला देऊन त्याला संजिवनी देऊ शकतो. ब्रेनडेथ झालेली व्यक्ती दोन्ही मुत्रपिंड, हृदयाच्या झडपा, हृदय,आतडे,संपूर्ण यकृत,संपूर्ण फुफ्फूस जोडऊती, त्वचा,संपूर्ण स्वादुपिंड,अंगदान देऊ शकतो.
कुठलीही व्यक्ती मरणेपरांत संपूर्ण देहदान, नेत्रदान ( ४ ते ६ तासातच), त्वचादान ( ६ तासातच) दान देऊन जिवंत व्यक्तीला संजीवनी देऊ शकतो.ब्रेन डेड म्हणजे मेंदूला गंभीर स्वरुपाचा जोराचा मार लागल्यावर किंवा मेंदुत रक्तस्त्राव झाल्यानंतर किंवा एखादया आजारामध्ये मेंदू निकामी झाल्यावर संबंधित व्यक्ती ब्रेनडेड झाल्याचे वैद्यकीय शास्त्रात म्हंटले जाते. आणि अशा व्यक्ती पुन्हा जीवंत होऊ शकत नाही. अशा ब्रेनडेड व्यक्तीचे शरीरातील मूत्रपिंड,हृदय,फुफ्फूस,आतडे आदि अवयव चांगल्या स्थितीत कार्यरत असतात आणि या अवयवांचे गरजू ‍िजवंत रुग्णांवर योग्य वेळेत प्रत्यारोपण होऊ शकते .
ब्रेनडेड रुग्णांच्या शरीरातील अवयवदान हे त्या कुटुंबाला दु:खातून सावरण्यासाठी दुस-या व्यक्तीचे जगणे शक्य केल्यामुळे ङ्कङ्कपुनर्जन्मङ्कङ्क झाल्याची भावना दु:ख हलके करु शकते. त्याकरीता सामाजिक संवेदनशिलतेला साद घालून संतुलन बाळगून व समुपदेशनाची पराकाष्ठा करुन योग्य निर्णय घेण्याची गरज आहे.एखादयाचा जीव वाचविण्यासाठी मृतदेहातून ( अंतविधी करण्याऐवजी) अवयव काढल्यास तो शरीरभंग झाला असे म्हणता येणार नाही. किंबहुना दुस-या व्यक्तीची विझणारी प्राणज्योत चेतविणे पुन्हा त्या संजीवनी प्राप्त करुन देणे हाच मानव धर्माचा परमोच्च बिंदू म्हणावा लागेल. देण्याचा आनंद अवर्णनीय असतो. म्हणून अवयवदान करुन जीवन वाचवायलाच हवा.
म्हणून चला तर आज आपण सर्वजण मिळून संकल्प करु या … अवयवदान करु या ..आटत नसतो रक्ताचा झरा दर तीन महिन्याला रक्तदान करा ेेंं मरावे परि नेत्ररुपी उरावे ेेंं
डॉ. सुवर्णा हुबेकर
वैद्यकीय अधिकारी
बाई गंगाबाई महिला रुग्णालय,गोंदिया