गोवारीटोल्यातील महिलांच्या स्वावलंबनाला संजीवनीचा आधार

0
8

berartimes.com गोंदिया,दि.८ : ग्रामीण भागातील कष्टकरी महिला पदरमोड करून पैशाची बचत करीत आहेत. हाच पैसा त्यांना बचतगटाच्या माध्यमातून स्वावलंबी बनविण्यास आधार ठरला आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाने ग्रामीण भागातील महिलांना बचतगटाच्या माध्यमातून संघटीत करून आर्थिक साक्षरता, नेतृत्व विकास, उद्योजकता विकासाबाबत प्रशिक्षण देवून आणि योग्य मार्गदर्शनातून स्वावलंबनाचा मार्ग दाखिवला आहे. गोवारीटोल्यातील आदिवासीबहुल महिला सभासदांसाठी संजीवनी आदिवासी स्वयं सहाय्यता महिला बचतगट त्यांच्यासाठी मार्गदाता ठरला आहे.
गोरेगाव तालुका मुख्यालयापासून २३ कि.मी. अंतरावर असलेले गोवारीटोला हे गांव. गावातील १0 आदिवासी व अन्य समाजातील महिलांनी एकत्न येवून संजीवनी महिला बचतगटाची स्थापना २0 ऑक्टोबर २00८ रोजी आदिवासी उपयोजनेंतर्गत केली. चोपा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत संजीवनी बचतगटाने आपले बचत खाते उघडले. सुरु वातीला ५0 रूपये याप्रमाणे बचतगटातील प्रत्येक महिला बँकेत महिन्याकाठी बचत करु लागली. माविमच्या मार्गदर्शन व प्रशिक्षणामुळे त्यांच्यात आत्मविश्‍वास बळावला.
जानेवारी २0१३ पासून प्रत्येक महिला महिन्याला १00 रूपये बचतगटाच्या बँक खात्यात पैसे जमा करु लागली. महिलांची दर महिन्याला नियमित बचत आणि अंतर्गत आर्थिक देवाण-घेवाण बघून दिलेले प्रशिक्षण व मार्गदर्शनामुळे आपणही उद्योग-व्यवसाय सुरु करु न स्वावलंबी होवू शकतो, असा आत्मविश्‍वास महिलांमध्ये निर्माण झाला. गटातील अंतर्गत कर्जाचा उपयोग महिलांनी शेती, आरोग्य, घरकाम आणि मुलामुलींच्या शिक्षणासाठी केला. माविमच्या माध्यमातून संजीवनीच्या महिलांना आर्थिक साक्षरता, नेतृत्व विकास, लेखा संच आणि उद्योजकता विकासाचे प्रशिक्षण मिळाले.
बचतगटातील महिलांनी आपल्या कष्टातून जमा केलेले ३६ हजार रूपये ३ वर्षाकरिता जानेवारी २0१५ मध्ये फिक्स डिपॉझीट केले. आता त्यांना जानेवारी २0१८मध्ये ४८ हजार रूपये मिळणार आहेत. बचतगटातील महिलांची अंतर्गत कर्जामध्ये गरज पूर्ण होत नसल्यामुळे माविमच्या सहयोगिनी रत्नमाला सरजारे यांच्या मार्गदर्शनाने आयसीआयसीआय बँकेकडून १६ एप्रिल २0१३ ला एक लाख ९६ हजार ९00 रु पयांचे कर्ज मिळवून दिले. तसेच १६ नोव्हेंबर २0१५ मध्ये याच बँकेकडून पुन्हा ३ लाख ३४ हजार ८00 रु पये बचतगटाला कर्ज मिळवून देण्यात सहयोगिनी सरजारे यांनी मोलाची मदत केली.
बचतगटातील उत्तरा औरासे यांनी ५0 हजार रु पये, रु पाली औरासे यांनी ५0 हजार रु पये आणि छाया येळे यांनी ७५ हजार रु पये कर्ज घेवून शेतीला सिंचनाची बारमाही व्यवस्था व्हावी म्हणून स्वत:च्या शेतात बोअरवेल करून घेतली. केवळ खरीप हंगामात पावसाच्या भरवशावर शेती करणार्‍या महिलांना रबी व उन्हाळी पिकांसाठी बोअरवेल उपयुक्त ठरली. त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या थोड्या शेतीतून उत्पन्नात वाढ होण्यास मदत झाली.
शेवंता बिसेन यांनी ७५ हजार रु पयांतून मालवाहक गाडी खरेदी केली. तसेच बचतगटातून अंतर्गत कर्ज म्हणून ४५ हजार रूपये घेवून मंडप डेकोरेशनचा व्यवसाय सुरु केला. बचतगटामुळे मालवाहक गाडीला भाडे मिळू लागले आणि डेकोरेशनचा व्यवसायही चांगला चालू लागला.
संजीवनी महिला स्वयंसहायता बचतगटामुळे महिलांच्या उत्पन्नाचे आर्थिक स्त्नोत वाढण्यास मदत झाली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबास आर्थिक हातभार लागण्यासही मदत झाली.