येरलीत शिवसैनिकांनी जाळला नवाज शरीफांचा पुतळा

0
13

berartimes.com तुमसर,दि.29 : पाकिस्तानी आतंकवादयांनी जम्मूकश्मीर मध्ये उरी येथील मिलिटरी शिबिरावर केलेल्या हल्यामध्ये १८ भारतीय जवान शहीद झाले, त्या निषेधार्थ तालु्क्यातील येरली येथे  शिवसेनेतर्फे शेकडो शिवसैनिकांनी व ग्रामवासियांनी पाकिस्तानचा  निषेध नोंदवित पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ यांच्या पुतळ्याचे दहन केले.यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद, नवाज शरीफ मुर्दाबाद च्या घोषणा देण्यात आल्या. शिवसेनेचे ओमेश्वर वासनिक, साहेबराव पारधी, ग्रामपंचायत येरलीचे सरपंच मदन भगत, ग्रामपंचायत सदस्य गणेश मेश्राम, सीताराम पारधी, सुधाकर हरिनखेड़े, देवेंद्र पारधी, गजानन कटरे, आशीष पारधी, जितेंद्र भगत, नीलेश बागड़े, कपिल पारधी, भालू कोहळे, विजय राहांगडाले,नितिन टेंभरे, रामकिशोर सहारे तथा बहुसंख्याने ग्रामवासी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.