ईटखेडा हत्या प्रकरणी चार आरोपिंना सहा ऑक्टोबंर पर्यंत पोलीस कोठडी

0
19

berartimes.com
अर्जुनी मोर,दि.29-तालुक्यातील ईटखेडा येथील ओमप्रकाश लांजेवार हत्येप्रकरणी नागरींकांच्या प्रचंड रोष व आंदोलनामुळे चार संशयीत आरोपींना पोलीसांनी अटक करुन त्यांना दिवाणी न्यायालय अर्जुनी मोर येथे हजर केले. दिवानी न्यायाधिस स्वप्णील रामटेके यांनी चारही आरोपिंना सहा आक्टोबंर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामध्ये मृतकाची पत्नी रंजना ओमप्रकाश लांजेवार (वय 32), मृतकाचे सासरे रामकृष्ण ऊर्फ बंडु फत्तु तलमले (वय55 रा अड्याळ) , शरद गुलाबराव मोहरकर (वय 33 रा खमारी बुटी) तसेच मिताराम ऊर्फ निताराम बाबुराव लांजेवार (वय 25) यांचा समावेश आहे. वृत्तलिहिपर्यंत लांजेवार यांचा मृतदेह इटखेडा येथे पोचलेले नव्हते,रात्रीपर्यंत मृतदेह येण्याची शक्यता असून रात्रीच अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे.
प्रकरण असे की,ईटखेडा येथील ओमप्रकाश दशरत लांजेवार (मृतक) हा 25 सप्टेंबर च्या रात्री पासून बेपत्ता होता.त्याचा मृतदेह 26 सप्टेबंरला पळसगांव घाटी शिवारातील ईटियाडोह कालव्यात तरंगताना आढळला.लगेच अर्जुनी मोर पोलीसांनी  घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरला आणले. 27 सप्टेंबरला शवविच्छेदनानंतर दुपारी एकच्या दरम्यान अंत्यविधीसाठी ईटखेडा येथे आणन्यात आले मात्र मृतकाचा भाऊ व गावकरी यांनी मृतकाच्या घरी जावुन पाहणी केली असता त्यांचे खोलीत सर्वत्र रक्ताचे डाग आढळुन आले.त्यामुळे गांवकरी व घरच्या मंडळींनी ओमप्रकाशचा मृत्यु हा नैसर्गिक नसुन त्याची हत्या करण्यात आली असा संशय व्यक्त करुन खुनाच्या आरोपिंवर गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक करण्याची मागणी केली. तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका घेतली.मृतदेह रात्रभर घरासमोर टॅक्टर मधेच ठेवले. यावेळी ठानेदार संजय बंडगर यांनी गांवकर्यांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र गावकरी गुन्हेगारांना पहीले अटक करा या मागणीवर ठाम राहीले होते. दुस- या दिवशी गांवकर्यांनी 28 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता थेट पोलीस स्टेशनला मृतदेहच नेले.गावकरी वकुटुंबियांनी आक्रमक पवित्रा घेत पोलीस चौकशीच्या विरोधात प्रचंड गदारोळ करीत चक्काजाम आंदोलन केले.

यावेळी देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी नागरीकांची समजुत काढन्याचा प्रयत्न केला तरीही नागरीकांचे समाधान झाले नाही. तेव्हा अतीरीक्त पोलीस अधिक्षक डॉ संदिप पखाले यांनी नागरीकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून सदर घटने संदर्भात भांदवी 302-34 कलमान्वये गुन्हा दाखल केला. तसेच गावकरी यांनी शवविच्छेदनावरही आक्षेप घेतल्याने सदर दुस- यांदा शवविच्छेदन करण्यासाठी नागपुरला पाठविले.या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.