पुर्व विदर्भातील मालगुजारी तलावांचा विकास- फडणवीस

0
23

नागपूर : विदर्भाचा अनुशेष भरण्याची आणि विदर्भाचा विकास करण्याची संपूर्ण जबाबदारी ही सरकारची आहे. त्यामुळं येत्या काळात विदर्भातील विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आज स्वतंत्र विदर्भाच्या चर्चेवेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विदर्भावरील अन्याय दूर करण्याचं आश्वासन दिलं.
दरम्यान सुरवातीला सभागृहात एकच मंत्री हजर राहिल्याने गोंधळ उडाल आणि कामकाज तहकुब करावे लागले.काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार,गोपालदास अग्रवाल यांच्यासह विदभार्तील आमदारांनी विदभर् राज्याच्या घोषणा देत विदभर् विकासाची मागणी केली.राष्ट्रवादीचे अजित पवार यांनीही सरकारने आता विदभार्च्या विकासासाठी काम करावे असे विचार व्यक्त केले.

आघाडी सरकारनं विदर्भावर अन्याय केला :
आघाडी सरकारच्या सत्तेच्या काळाता नेहमीच विदर्भावर अन्याय झाला. पण आता युती सरकार हा अन्याय दूर करण्यासाठी कटिबद्ध आहे. असा टोमणा मुख्यमंत्र्यांनी आघाडीच्या नेत्यांना लगावला. विदर्भातील लोकांवर अनेक बाबतीत अन्याय झाला असून हा अन्याय सरकार दूर करेल असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलं.

अमरावती विभागातील अनुशेष असेल किंवा विदर्भातील विकासकामं सर्वच बाबींसाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल असं सांगत मुख्यमंत्र्यानी विदर्भावर घोषणांना पाऊस पाडला.
वीजेचा अधिभार रद्द करणार :
महाराष्ट्राला फडणवीसांच्या रुपानं विदर्भाचा मुख्यमंत्री लाभल्यानं विदर्भावरील अन्याय दूर करण्याचा विडा राज्य सरकारनं घेतला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे विदर्भातील वीजेवरचा अधिभार रद्द करण्यासाठी सरकारनं हालचाली सुरु केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेतील भाषणात दिलीस आहे. यासाठी एमईआरसीकडे मागणी केल्याचंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

गेल्या अनेक वर्षांपासून राज्याची वीजेची गरज मोठ्या प्रमाणावर विदर्भाकडून भागवली जाते आहे. मात्र केवळ विदर्भातील जनतेवरच वीजेचा अधिभार लावला जात होता. त्यामुळे विदर्भातील जनतेवरील अन्याय दूर करत अधिभार हटवण्याचे प्रयत्न सरकारनं सुरु केले आहे.

लोणार सरोवर आणि गोसिखूर्द :
त्यासोबतच गोसिखूर्द प्रकल्प आणि लोणार सरोवर आदिंबाबतही मुख्यमंत्र्यांनी महत्वाच्या घोषणा केल्या. लोणार सरोवराला वर्ल्ड हेरिटेज म्हणुन लवकरचं जाहीर करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. यामुळं विदर्भाच्या पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

गोसिखुर्द प्रकल्पाचं भुसंपादन 2015 पर्यंत पूर्ण करुन 2017 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. तसंच गोसिखुर्द प्रकल्पाची किमंत 3 हजार 300 कोटीवरुन वाढवून 14 हजार कोटी झाल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या भाषण आणि महत्वाच्या घोषणा :
– विदर्भातील लोकांमधे अशी भावना तयार होण्यामागे वास्तविक अन्याय झाला आहे

– विदर्भावर अन्याय झाला आहे म्हणून वेगळेपणाची भावना झाली आहे.

– आघाडी सरकारनं केलेला अन्याय दूर कऱण्याची आता वेळ आणि जबाबदारी आमच्यावर आली आहे.

– आम्ही आता बदल्या आणि नियुक्त्या केल्या आहेत..या सभागृहाच्या मार्फत मी सांगू इच्छितो की सर्व अधिकाऱ्यांना रूजू व्हावेच लागेल.

– बदली झालेली व्यक्ती कामावर रूजू झाली नाही तर कडक कारवाई होईल.

– मालगुजारी तलाव पद्धतीचं पुनरूज्जीवन कऱणार. 15 दिवसांत परिणाम दिसतील.

– पूर्व विदर्भातील 132 मालगुजारी तलावांतील गाळ 2 वर्षांत स्वच्छ केला जाईल.

– 10 हजार क्विंटल बियाणं साठवण्यासाठी अकोल्यात शीतगृह बांधणार.

– विदर्भाकरता विजेच्या उपलब्धतेवरील सरचार्ज काढण्यासाठी एमईआरसीकडे मागणी.

– अमरावती एमआयडीसीमधे टेक्सटाईल हब बनवण्यासाठी 2 हजार कोटींची गुंतवणूक कऱणार..अनेक गुंतवणूकदार तयार आहेत.

– अमरावतीमधे वर्षभर नाईट लँडिंगची सुविधा असलेलं विमानतळ येत्या तीन वर्षांत सुरू करणार..त्या विमानतळावर बोईंग 747 ही उतरवलं जाऊ शकेल.

– गोसिखुर्द प्रकल्प २०१७ पर्यत पुर्ण करणार , भुसंपादन मार्च २०१५ पर्यत पुर्ण करू.

– अमरावती विभागाचा अनुषेश १९९४ पासुन कायम , विभागातील १०२ प्रकल्प जुन २०१५ पर्यत पुर्ण करणार.

– गोसिखुर्द प्रकल्पाची किमंत ३३०० कोटीवरून १४००० कोटी इतकी झाली आहे.

– विदर्भातील राज्यमहामार्गावरील सर्व खड्डे जानेवारी अखेरपर्यंत दुरूस्त करणार.

– लोणार सरोवर वर्ल्ड हेरिटेज म्हणुन लवकरचं जाहिर करणार , पर्यटनाला मोठी चालना मिळेल.

– विदर्भातील कामांकरता निधी अपुरा पडू देणार नाही.

– महाराष्ट्रातील 6 प्रादेशिक विभाग मुख्यालयांना नाईट लँडिंग विमानतळांनी येत्या तीन वर्षात जोडलं जाईल.