सडक अर्जुनी तालुक्यात ओबीसी जनचेतना यात्रेला प्रतिसाद

0
16

सडक अर्जुनी,दि.30- राष्ट्रीय ओबीसी महासंघ,गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती व ओबीसी सेवा संघाच्या वतीने काढण्यात आलेल्या ओबीसी जनचेतना अभियानाला चांगला प्रतिसाद गोंदिया जिल्ह्यात मिळालेला असून अर्जुनी मोरगाव तालुक्यातून प्रारंभ झालेल्या या अभियानातील रथयात्रेत सडक अर्जुनी ,गोरेगाव तालुक्यातील नागरिकांना उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे.ओबीसी समाजाच्या हक्कासाठी आम्ही सर्व येणार कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांने आम्हाला अडविण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही यावेळी गप्प बसणार नाही अशी भूमिका ऑेबीसी नागरिक जनचेतना यात्रा जेव्हा गावात पोचते त्यावेळी व्यक्त करु लागली आहे.तर काही राजकीय पक्षाचे लोक आम्हाला या अभियानात सहभागी होऊ नका मोच्र्यात जाऊ नका असेही म्हणत असल्याचे जनता सांगू लागल्याने त्या पक्षाची ओबीसी बद्दलची भूमिकाही आत्ता स्पष्ट दिसू लागल्याने जनतेनेच आत्ता आम्ही स्वमर्जीनेच सहभागी होऊ अशा नारा या अभियाना दरम्यान तिन्ही तालुक्यात दिला आहे.30-nov-27
सडक अर्जुनी: संविधान दिवसाचा औचित्ङ्म साधून ओबीसी बांधवाकडून बाबासाहेब आंबेडकरांच्ङ्मा संविधानातील ३४० कलमाची स्वातंत्र्ङ्मनंतरही एससी आणि एसटी प्रमाणे ओबीसी प्रवर्गाला कोणताही शासन स्तरावर ओबीसींना शैक्षणिक, आर्थिक़, सामाजिक विकासात्मक ७० वर्षापासून शासनाने कोणताही मदत न दिल्ङ्मामुळे ८ डिसेंबर रोजी दिक्षाभूमीवरुन ओबीसींचा विशाल मोर्चा विधान भवनावर झळकणार आहे. या अनुषंगाने गोंदिया जिल्हा ओबीसी जनचेतना रथ .मोरगाव अर्जुनी कृषी उत्पन्न बाजार समितीतून ओबीसीचे राजकीय समन्वयक डॉ. खुशाल बोपचे यानी झेंडी दाखवून सुरुवात केली. २७ नोव्हेंबर रोजी सडक अर्जुनी तालु्क्यामध्ये ओबीसी रथाचे पदार्पण होताच भव्य स्वागत करण्यात आले. तालुकाध्यक्ष दिनेश हुकरे, कार्याध्यक्ष हरेश कोहळे, संघटक लिलेश रहांगडाले, विलास चव्हाण, मार्गदर्शक शेषराव गिèहेपुंजे, बापू भेंडारकर, माधव तरोणे, मधसूदन दोनोडे, राजु पटले, अनिल कोरे, पुष्पा खोटेले, कैलाश डोये, हेमत हेमणे, चैतराम खोटेले, प्रेमलाल मेंढे, नारबा चौधरी, उमराव चौधरी, छगन चौधरी, दिनेश ठाकरे, अशोक गुरनुले, मुनेश चौधरी, परसराम लांजेवार, विलास लांजेवार, तिलक येवले, एकनाथ गायधने, अनिल लांजेवार आदी उपस्थित होते.
या मोर्च्याचे आगमन नवेगावबांधपासून कोकणा, कनेरी, मनेरी, चिखली, राका, सौंदड, तिडका, सडक अर्जुनी, वडेगाव परसोडी, डोंगरगाव, कोहळीटोला, वृंदावनटोला, खजरी, बोथली, मसवानी, घोटी, घटेगाव, मुंडीपार, चिचटोला, कोसमंतोंडी, धनोरी, सितेपार, पांढरी, गांगले, मुरपार‘ राका, पळसगाव, डव्वा, भुसारीटोला, पाटेखुर्रा, मुरदोली गावात पोचली. विशेष म्हणजे कोसमतोंडी पांढरी येथील ज्युनीयर कॉलेजच्या विद्यार्थानी रथाला अडवून ओबीसी बद्दल आम्हाला मार्गदर्शन करा असा आग्रह धरताच ओबीसी जनचेतना रथाचे प्रमुख जिल्हाध्यक्ष बबलू कटरे,जीवन लंजे, ओबीसी संघटनेचे महामंत्री मनोज मेंढे यांनी संविधानाच्या ३४० कलमाची सविस्तर माहिती दिली व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. तिडका येथील जनचेतना यात्रेच्या सभेला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजकीय समन्वयक डॉ. खुशाल बोपचे यांनी मार्गदर्शन करीत मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.