ट्रायकोड्रमा आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी शास्त्रज्ञांची गोंदियातील जैविक फार्महाऊसला भेट

0
57

१५ वी आंतरराष्ट्रीय परिषद स्पेनमध्ये होणार

गोंदिया दि. 30 : -भारतात आयोजित १४ व्या आंतरराष्ट्रीय ट्रायकोड्रेमा परिषदेत सहभागी झालेल्या १२ देशातील सुमारे ६७ शास्त्रज्ञाच्या चमुनी गोंदिया तालुक्यातील मजितपूर येथील रुची एग्रो फार्मला भेट देऊन ट्रायकोड्रेमाचा उपयोग उत्पादन व वापरासदंर्भात माहिती घेतली.या शास्त्रज्ञाच्या चमूत न्युझीलंड,चीन,इजराय, लोवासाटे, स्पेन,युएसए,फ्रान्स, टेक्सास,स्विडन,कोस्टारिया या देशातील शास्त्रज्ञासह भारतातील शास्त्रज्ञ व पीकेव्ही विद्यापीठाचे शास्त्रज्ञ सहभागी झाले होते. ज्यात डॉ.प्रतिभा शर्मा,डॉ.आर.बी.सोमानी, कुलदीप qसग ठाकूर,डॉ.राजेश गाडे,डॉ.सुभाष पोटदुखे, डॉ.एस.बी.ब्राम्हणकर,भालचंद्र ठाकूर यांचा समावेश होता. सध्या संपूर्ण जगात किटकनाशकांच्या वापरामुळे होणारे दुषपरिणाम तसेच शेतातील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी विविध प्रकारचे संशोधन सुरू आहेत.अगदी सुक्ष्मपातळीवर याचे नियोजन सुरू असून संशोधनातून जमिनीतून होणाèया विविध पिकांवरील रोगांवर जैविक उपाय योजना म्हणून जैविक बुरशी नाशक म्हणून ड्रायकोड्रेमाचा उपयोग केला जात आहे.याच्या संशोधनाला गती मिळावी तसेच या तंत्राचा प्रचार प्रसार व्हावा व सर्व सामन्य शेतकèयाना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी इंडिय फ्लंटो पॅथालाजी नई दिल्ली, पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांच्या सयुक्त सहकार्याने या १४ व्या परिषदेचे नागपूर मध्ये ३ दिवसीयपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते.त्यात क्षेत्रभेट म्हणून या परिषदेत सहभागी झालेल्या शास्त्रज्ञानी रूचि एग्रो फार्मला भेट दिली.lead
या परिषदेच्या आयोजिका डॉ. प्रतिभा शर्मा यानी माहिती दिली की,या परिषदेचा लाभ सर्वाधिक वैज्ञानिक व या विषयात शोध करणाèया विद्याथ्र्यांना होणार आहे.विचाराचे आदान प्रदानाच्या फायदा शेतकèयानाही होईल व किटकनाशकाच्या वापरामुळे संपूर्ण जगाला होणारे नुकसान काही प्रमाणात कमी करता येईल या परिषदेत संपूर्ण जगातून सुमारे २५० लोक सहभागी झाले यात १७७ प्रोजेक्ट तर १७५ शोधप्रबंध सादर झाले यावरून ही परिषद किती महत्वाची आहे हे लक्षात येवू शकेल.पुढील १५ वी परिषद स्पेन मध्ये होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
चीन मधीन पेचिन मधून परिषदेत सहभागी झालेले शिडॉग ली यांनी भारताच्या तुलनेत चीनमध्ये रोगांचे प्रमाण पीकावर खूप जास्त असल्याचे सांगितले.न्युझीलॅन्डचे जॉन हॅम्पटन यानी सेन्द्रीय शेती काळाची गरज असून या शेतीला जागतिक बाजारपेठ असल्याचे सांगितले.स्वीडनचे दान फèक जेनसन, इजरायचे बेंजामिन होरविज, टेक्सासचे नबुरम घोष, न्युझीलॅडचे हॅम्पटन, राबर्ट हील, जेसिका, मारडली आरटेयिवो मेंडोगा,डी. आर.कांदूला, चायाचे मानहॉग सून,शी.डॉग ली,स्वीडनच्या मॅगनेरा कार्लेसन्स,स्पेनच्या इनरी्नम मोन्टे,यूएसएचे श्रीशाली नावी, टेक्सासच्ङ्मा मधू कूंंटा, कोस्टरियाच्या मिचाईल ओबेस्ट्राय,फान्सचे बेन अजिमा यानी ही सूचक प्रतिक्रिया व्यक्त करून ट्रायक्रोड्रेमाचा उपयोग शेतकèयासाठी फायदाच्या असल्याचे सांगितले.याप्रसंगी रूचि एग्रो फार्मचे संस्थापक श्रीराम ठाकूर यांच्या हस्ते सर्व शास्त्रज्ञांचे भारतीय पंरपरेनुसार फेटा बांधून व पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यातत आले.तसेच रूची एग्रो फार्म तर्फे निर्मित ट्रायकोड्रेमा या उत्पादनाचा वापर तसेच शेतात लावलेल्या ढोबळी मिरची,शिमला मिरची,अदरक,हळद या पिकावर फवारणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.संचालन डॉ.आर.व्ही सोमानी यानी केले आबार भालचंद्र ठाकूर यांनी मानले. आयोजनासाठी अकोला कृषी विद्यापीठाचे कुलगूरु डॉ.रवीप्रसाद दाणी,अकोलाचे डॉ.आर.व्ही.सोमानी,डॉ.कुलदिपqसह ठाकूर,डॉ.श्रींकात ब्राम्हणकर,डॉ.राजेश गाडे,डॉ.सुभाष पोटदुखे यांच्यासह नागपूर कृषी महाविद्यालयाने पुढाकार घेतला होता.