..अन्यथा 1 डिसेंबरनंतर गॅस सबसिडी बंद होण्याची भीती

0
20

नवी दिल्ली, दि. 30 – गॅस वितरकांकडे अद्यापही आधार कार्ड नंबर दिला नसल्यास तुम्हाला मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आधार कार्डचा नंबर न दिलेल्यांना 1 डिसेंबरनंतर गॅस कनेक्शन असूनही, सबसिडी मिळणार नाही. तसेच तुम्हाला गॅसची सबसिडी पाहिजे असल्यास आधार नंबर देणे बंधनकारक आहे.

रिपोर्टनुसार, आयओसीद्वारे जारी करण्यात आलेल्या निर्देशानुसार 1 डिसेंबरपूर्वी ज्यांनी आधार कार्डचा नंबर गॅस वितरकांना दिला आहे. त्यांनाच सबसिडी मिळणार आहे. मात्र 1 डिसेंबरनंतर आधार कार्डचा नंबर न दिलेल्या ग्राहकांना सबसिडी मिळणार नाही. तुम्ही गॅस सिलिंडरचा वापर करत असाल तो तुम्हाला आधार कार्डनंबर देणे बंधनकारक आहे. नाहीतर तुम्ही कायमचे सबसिडीला मुकणार आहात.

आधार कार्ड नंबर गॅस वितरकांकडे देण्याचे केंद्र सरकारने कळविले. मात्र, अद्याप त्याकडे लक्ष दिलेले नाही. नोटबंदीनंतर सरकार आता गॅस सिलिंडर अनुदानावर नजर ठेवणार आहे.