तिसरे शेतकरी साहित्य संमेलन फेब्रुवारीला गडचिरोलीत

0
23

गडचिरोली,दि.30 : तिसरे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन २५ व २६ फेब्रुवारी २०१७ रोजी गडचिरोली येथील संस्कृती सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यीक प्रा. डॉ. शेषराव मोहिते राहणार असून उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या हस्ते होणार आहे.साहित्य क्षेत्रातील शेतीप्रधान साहित्याची उणीव भरून काढण्यासाठी अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळ कार्यरत असून या प्रयत्नांचा एक भाग म्हणून २०१५ मध्ये पहिले अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन वर्धा येथे, २०१६ मध्ये दुसरे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नागपूर येथे आयोजित करण्यात आले होते.

सात परिसंवाद होणार

४दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात आधुनिक शेती तंत्रज्ञान व शासकीय धोरण, मराठी साहित्यावर सोशल मीडियाचा प्रभाव, राज्य घटनेतील परिशिष्ट ९ व कायद्याचे जंगल, शेतकरी आत्महत्यांच्या राज्यात शेती यशोगाथांचे गौडबंगाल, पारंपरिक लोकगिते : ग्रामीण स्त्रीत्वाचे वास्तव दर्शन आदी विषयावर परिसंवाद होतील.