चंदन लागवडीतून शेतकरी आर्थिक क्रांती करु शकतो-माजी मंत्री प्रा.शिवणकर

0
72

गोदिया,दि.30- पूर्व विदर्भातील पारंपरिक धानाची शेती पाहता येथील शेतकरी अजूनही गरिबीचेच जिवन जगत आहे .त्यामुळे या धान शेतीला बगल देत फळबागासोबतच चंदनाची शेती करून शेतकरी हा आर्थिक क्रांती करु शकतो असे आवाहन जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील धावडीटोला येथे आयोजित शेतकरी मेळाव्या प्रसंगी माजी मंत्री प्रा. महादेवराव शिवणकर यांनी केले.धावडीटोला येथे चंदनाची लागवड व शेती याविषयावर शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते,त्यावेळी ते आयोजक म्हणून बोलत होते. मेळाव्याला महाराष्ट्रातील इतरत्र जिल्ह्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून चंदन मित्र म्हणून ओळखले जाणारे महेंद्र घाडगे उपस्थित होते.
गोंदिया जिल्हा पूर्व विदर्भातील भात शेती साठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असला तरी या ठिकाणी असलेले धान उत्पादक शेतकरी आहे .त्याच स्थितीत आजही आहे .धानाला मिळणार भाव तसेच उत्पादन खर्च वगळता .शेतकऱ्याचा हातात काहीच उरत नाही .त्यामुळे आजचा स्थितीला जिल्यातील बहुतांश शेतकरी पालेभाज्या या नगदी पिकाकडे वळले आहे .शिवाय ती आज काळाची गरज देखील आहे .त्यामुळे आज जिल्यातील शेतकरी मिश्र शेतीचा माध्यमातून आपला आर्थिक स्तर उंचावू शकतो .त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातून प्रेरणा यावी तसेच ते फळभाज्या पिकातून लखपती तर चंदनाचा शेतीतून कोट्याधीश व्हावेत या करिता भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता “चंदनाची शेती” मार्गदर्शन शिबिराचा माध्यमातून शेतकरी मेळाव्याचे आयोजन आमगाव तालुक्यातील धावडीटोला येथे करण्यात आले होते .तर विशेष म्हणजे या मेळाव्याचे आयोजक म्हणून खुद्द माजी अर्थमंत्री महादेवराव शिवणकर यांचे याचा तर्फे हे करण्यात आले होते . शिवाय आज ते राजकारणापासून अलिप्त झाल्यानंतर त्यांनी शेंद्रीय शेतीचा ध्यास धरत .त्यांच्याकडे असलेल्या १० एकर शेतीवर विविध पिकांची लागवड करीत .त्यांनी तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील शेतकर्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे .तर आजचा घडीला त्यांनी आपल्या शेतात .पिक पद्धतीमध्ये तांत्रिक पद्धतीचा अवलंब करीत .सिमला मिर्ची ,अद्रक ,टमाटर ,तुवर ,व इतर पालेभाज्यांची लागवड आज त्यांनी केली असून .नवनवीन प्रयोग सुद्धा ते करीत असतात .शिवाय ज धान उत्पादक शेतकरी नगदी पिकाकडे कसा वळेल याचे मार्गदर्शन देखील ते करीत असतात त्यामुळे मागील वर्षी त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतकरी मेळाव्याचा माध्यमातून याचा प्रयत्न त्यांनी केला होता व जिल्यातील १०० चा आसपास शेतकरी नगदी पिकाकडे वळले होते. त्यामुळे नगदी पिकातून मिळणारे उत्पन्न पाहता आता जिल्यातील शेतकरी फळबाग शेती सोबतच चंदनाची लागवड करीत कोट्याधीश व्हावा या भावनेतून या शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .शिवाय या मेळाव्याला संपूर्ण महाराष्ट्रात चंदन मित्र म्हणून ओळख असलेले महेंद्र घाडगे .यांचे देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन या मेळाव्याचा माध्यमातून लाभले
शेतात चंदनाची लागवड हि थोडीफार खर्चिक जरी असली तरी फायद्याची आहे .मात्र झाड मोठे झाल्यानंतर त्याच्यापासून मिळणारे फायदे हे प्रत्येक शेतकऱ्याला १० ते १५ वर्षात कोट्याधीश नक्कीच करू शकतात .त्यामुळे चंदनाचा शेती सोबतच फळबागा ची सोबतच लागवड केली .तर फळबागांचा माध्यमातून शेतकऱ्यांना दरडोई उत्पन्न प्राप्त होताच राहील .शिवाय फळबागेत लावलेल्या चंदनाचा झाडाची निगादेखील या निमित्ताने राखता येईल त्यामुळेच .कि काय आज वन विभाग देखील चंदन शेतीलागवडीवर भर देत असून शेतकऱ्यांनी त्याचा अवलंब करावे व किमान एका शेतकऱ्याने सुद्धा त्याची सुरुवात जिल्ह्यात करावी असा सल्ला त्यांच्यातर्फे देण्यात येत आहे
एकंदरीतच जिल्ह्यात चंदनाची लागवड हि संकल्पना नवीन असल्यामुळे इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही या मेळाव्याला आपली पसंती दाखवीत चंदनाचा शेतीचा मार्ग ते लवकरच अवलंबविणार आहेत त्यामुळे आता जिल्ह्यात वर्षानुववर्ष परंपरागत पद्धतीने धानाची लागवड करीत असलेल्या शेतकऱ्यांनसाठी हि सुवर्णसंधी असून त्याचा फायदा घेणारे शेतकरी आता कोट्याधीश होणार हे मात्र नक्की