शिक्षण हे कौशल्यानुरूप असणे गरजेचे : आ. रहांगडाले

0
21

तिरोडा,दि.30:- विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकी ज्ञानाकडे भर न देता इतर कौशल्य विकासाकडे सुध्दा लक्ष दिल्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होईल. तसेच स्पर्धेच्या युगात आजचा विद्यार्थी मागे पडणार नाही. ईश्वराने प्रत्येक व्यक्तीस एक व्यक्तीमहत्व दिले असून त्या व्यक्तीमत्त्वाची छाप समाज विकासाच्या दृष्टीने पाडण्याकरीता कित्येकदा हास्यास पात्र व्हावे लागते. तसेच ज्या व्यक्तीवर जास्तीत जास्त समाजाचे ताशेरे होताच तेच व्यक्ती समाजामध्ये सामोरे जात असतात, असे मत आ. विजय रहांगडाले यांनी व्यक्त केले. सुभाष विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या त्रिदिवसीय स्रेहसंमेलन उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरवात दिप प्रज्वलन, शारदास्तवनाने झाली असून कार्यक्रमाध्ये प्रामुख्याने अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष जितसिंग पटले, उद्घाटक म्हणून आ. विजय रहांगडाले हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. सदस्य मनोज डोंगरे, रजनीताई कुंभरे, डॉ विठ्ठलप्रसाद पारधी, तेजस्वीनी भोंगाडे, पं.स. सदस्य डॉ. बी.एस. रहांगडाले, पं.स. सभापती प्रभुदास सोनवाने, उमाशंकर चौधरी, भुमेश्वर पारधी, रिमाजी पारधी, गोटे, खवले, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. राजेंद्र पटले यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. रहांगडाले यांनी मानले.