28 शेतक-यांना मिळाले अटल सोलर कृषी पंप,13 पंप सुरु

0
16

गोंदिया,दि.19:- उर्जा सुरक्षेच्या दृश्टीने तसेच शेतक-यांची वीज बिलापासुन सुटका व्हावी या उद्देशातुन केंद्रशासन शेतक-यासाठी राबवित असलेल्या अटल सोलर कृषी पंप योजनेचा जिल्ह्यात शुभारंभ झाला आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या 28 शेतक-यांना सौर कृषी पंप देण्यात आले.तर वीज वितरण कंपनीने आणखी 13 अर्जदार शेतक-यांचे पंप मंजुर करुन जिल्ह्यात सौरऊर्जेच्या वापराला सुरवात केली आहे.
राज्यासह गोंदिया जिल्हा हा कृषीवर आधारीत जिल्हा असून नियीमत विद्युत पुरवठा किंवा विद्युत जोडणी नसल्यामुळे व भारनियमन असल्यामुळे शेती उत्पन्नावर अवलंबून असलेल्या शेतक-यांवर, पर्यायाने राज्यावर विपरीत परिणाम व्हायचे.शेतकर्यांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्यासाठी वीज वितरण कंपनीला अनुदान द्यावे लागत आहे. शिवाय औश्णिक पध्दतीच्या वीज निर्मितीमुळे पर्यावरणाचा -हासही होत आहे. त्यामुळे वायू प्रदूषर्णात भर पडत असून हवामानावर विपरीत परिणाम होत आहे. करीता केंद्र शासनाने शेतक-यांना कृषीपंपासाठी आता अटल सोलर कृषी पंप योजनेअंतर्गत सौर उर्जेचा वापर करण्याचे ठरविले व त्यातुनच सौर कृषीपंप योजना पुढे आली.योजनेतंर्गत जिल्ह्याचा समावेश असुन जिल्ह्यात ऑगष्टपासून ही योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्याला 195 कनेश्नचे टार्गेट देण्यात आले आहे. एकंदर कृषीपंपाना सौर उर्जेतून वीज पुरवठा झाल्यास शेतक-यांना वीज जोडणीसाठी ताटकळत रहावे लागणार नाही.वीज बीलाची थकबाकी असल्यास होणारी पंचाईत व वीज चोरीच्या प्रकारांपासून शेतक-यांची सुटका होणार आहे.जिल्ह्यात 111 लाभार्थी शेतक-यांना डिमांड नोट देण्यात आली. यातील 47 लाभार्थ्यांनी पैसे भरले असुन 28 कामे पूर्ण झाली आहेत. तर 13 शेतक-यांचे विभागाने वर्क ऑर्डर काढले असुन सध्या 13 शेतक-यांचे काम सुरु आहे. म्हणजेच जिल्ह्यातील 28 शेतक-याकंडील पंप सध्या सौर उजेैवर चालायला लागले आहेत.
या योजनेंतर्गत पाच एकरापेक्षा कमी शेती असलेले शेतकरीच लाभ घेऊ शकत होते, मात्र शासनाने यामध्ये शिथिलता आणली असुन आता 10 एकर शेती असलेले शेतकरीही या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.शिवाय 10 वर्ष पंप चालविल्यानंतर शेतक-यांना वीज वाहिनी टाकुन वीज पुरवठाही दिला जाणार आहे. या योजनेंतर्गत केंद्रशासनाकडुन 3, 5 व 7.5 एच.पी. चे. (अष्वशक्तीचे) पंप पुरविण्यात येणार असल्तायची माहिती विज महावितरण कंपनीच्यावतीने देण्यात आली आहे.