नक्षलग्रस्त भागातील गड़चांदूर एसडीपीओ कार्यालयाला आयएसओ मानांकन

0
9

चंद्रपूर,दि.28: गुणवत्ता आणि दर्जा राखण्यासाठी आएसओ हे मानांकन नक्षलग्रस्त समजल्या जाणाऱ्या दुर्गम भागातील गडचांदूर येथील पोलीस उपविभागीय कार्यालयाला प्राप्त झाले आहे. नलक्षग्रस्त भागातील शासकीय कार्यालयाला प्रथमच आयएसओ प्रमाणपत्र मिळाले आहे.गडचांदूर पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात जिवती, गडचांदूर, पाटण, कोरपना, टेकमांडवा, भारी, पिट्टीगुडा आदी पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. हे सर्व पोलीस स्टेशन दुर्गम आणि पहाडी क्षेत्रामध्ये आहेत. दुर्गम भागात प्रतिकूल परिस्थिती असताना कामात सातत्य राखण्यात यश आले. गडचांंदूर एसडीपीओच्या कार्यक्षेत्राला लगत परराज्याची सीमा आहे.हे प्रमाणपत्र पालकमंत्री व राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते देण्यात आले.
जिल्ह्यातील जिवती तालुका नक्षलग्रस्त भागाच्या यादीत आहे. . गडचांदूर या पहाडावरील दुर्गम भागातील उपविभागीय अधिकारी कार्यालयालयाने नागरिकांना तत्पर सेवा देतानाच त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. कार्यालय परिसरात स्वच्छता राखणे, कार्यालयातील अभिलेख नियमावलीनुसार अद्यवत ठेवणे आदी कामांवर लक्ष केंद्रीत करून उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी कामाला सुरुवात केली. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवान आणि अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. आयएसओ मानांकन देणाऱ्या आंतराष्ट्रीय प्रमाणके संघटनेनेच्या पथकाने या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाची पाहणी केली. गडचांदूर पोलीस उपविभागीय कार्यालयाला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आयएसओ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. पोलीस मुख्यालयाच्या परेड ग्राऊंडवर प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते जिल्हा पोलीस अधीक्षक दिवान, अपर पोलीस अधीक्षक राजपूत आणि एसडीपीओ खिरडकर यांनी आयएसओ प्रमाणपत्र स्वीकारले. यावेळी आ. नाना शामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदरसिंह, डीवायएसपी जयचंद काठे आदी उपस्थित होते.