राज्यपाल राव यांच्या ‘इन द सर्व्हिस ऑफ द पीपल’ कॉफीटेबल बुकचे प्रकाशन

0
18

मुंबई, दि. 31 : राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या मागील 2 वर्षांच्या कारकिर्दीचा मागोवा घेणाऱ्या ‘इन द सर्व्हिस ऑफ द पीपल’ या कॉफीटेबल बुकचे आज राजभवन येथे झालेल्या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन झाले.
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, परिवहन मंत्री दिवाकर रावते, शिक्षण मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमित मलिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रविण परदेशी, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, राज्यपालांचे सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, चित्रपट अभिनेत्री जुही चावला, झी 24 तास वृत्तवाहिनीचे संपादक उदय निरगुडकर, कला दिग्दर्शक नितीन देसाई, निवृत्त सनदी अधिकारी शरद काळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी विधानसभेचे विरोधी पक्षनेते श्री. विखे-पाटील, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनीही राज्यपाल श्री. राव यांच्या मागील दोन वर्षाच्या कारकिर्दीचा गौरव केला. राज्यपालांचे सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. राज्यपालांचे उपसचिव परिमल सिंह यांनी आभार मानले. वरिष्ठ सहाय्यक संचालक (माहिती) मीनल जोगळेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांच्यासह राजभवनातील अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.