शेतकरी संघटनेचे राष्ट्रपित्याला साकडे

0
20

वर्धा दि. 31 ; युगात्म ते महात्मा या घोषवाक्यांतर्गत एकत्र येऊन शेतकरी संघटनेने आज हुतात्मा दिवसाला सेवाग्राम आश्रमासमोर प्रार्थना करून शेतकरी हितासाठी राष्ट्रपित्याला साकडे घातले . मराठवाडा , विदर्भ , पश्चिम महाराष्ट्र तसेच पंजाब प्रांतातूनही येथे शेतकऱ्यांनी हजेरी लावून शेतकरी हितासाठी प्रार्थना केली . महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी , सामान्य माणसासाठी आणि शेतकऱ्यांसाठी आंदोलने केली . पण आज मात्र हि आंदोलने विसरून राज्यकर्ते शेतकऱ्यांना पुन्हा गुलामगिरीत ढकलत असल्याचा सूर सेवाग्राम येथे शेतकरी संघटनेकडून आवळल्या गेला .
शेतीचे आर्थिक स्वातंत्र्य समाजवादाच्या पिंजऱ्यात कैद करून सुराज्य राजकीय पक्ष पायदडी तुडवत आहेत . या राजकीय पक्षांची तक्रार आम्ही राष्ट्रपित्या महात्मा गांधी यांच्याकडे निवेदनातून करतो आहे असे शेतकरी संघटनेने निवेदनात म्हटले आहे . कमल जमीन धारणा कायदा , आवश्यक वस्तूंचा कायदा , सक्तीचा जमीन अधिग्रहण कायदा रद्द करण्यासाठी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनानेने राष्ट्रपित्याला प्रार्थना केली . पूर्णवेळ वीज , शेतीव्यवसायातून रोजगार संधी , अंतर्गत बाजारपेठेचा विकास शेतकरी विरोधी नीतीचा विरोध यासारख्या बाबी शेतकरी संघटनेने निवेदनात नमूद केल्या आहेत . ‘ सब राजकीय दलो को संमती दे भगवान ‘ अशी प्रार्थना यावेळी शेतकरी संघटनेने केली . तक्रार वॉज प्रार्थनेचे निवेदन शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सेवाग्राम आश्रमातील महात्मा गांधी यांच्या आसनाजवळ ठेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहे . या कार्यक्रमाला पंजाब येथील माजी खासदार भूपेंद्रसिंग मान , वामनराव चटप , मदन कामळे , गंगाधर मुळे, सरोज काशीकर आदी उपस्थित होते .