एनएसएसच्या स्वयसेवकांनी साधला;राष्ट्रविकासाचा सेवामार्ग

0
13

खेमेंद्र कटरे
तरुण पोरांची मोबाईलवर भराभर फिरणारी बोटं पाहिली की त्यांचा हेवा वाटतो. ही मुलं नवीन तंत्रज्ञान झटपट आत्मसात करून वापरतात सुद्धा. पण, त्यात ‘टाइमपासङ्कचा भाग किती आणि उपयोग काय? गेल्या दहा वर्षात जग सर्वाधिक वेगाने विकसित झाले. लोकांनी स्वीकारलेले आणि जगणं सोपे झाले अशा तंत्रज्ञानामध्ये मोबाईलचा नंबर पहिला असेल. अशा काळातही आजची युवक विद्यार्थी विद्यार्थिनींनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून देशसेवेसाठी वेळ देण्याचा केलेला प्रयत्न वाखाणण्या योग्य आहे.
‘सेवा परमोधर्मःङ्क ही आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. जन्म ते मृत्यू या जीवनप्रवासात भारतीय संस्कृतीमध्ये किती तरी प्रकारच्या सेवांचा अंतर्भाव दिसून येतो. आपली कुटुंबव्यवस्था आणि समाजरचना सेवाधारितच असल्याचे दिसून येते. माता-पित्यांच्या सेवेपासून सुरू झालेले सेवा वर्तुळ समाजमनाबरोबर विस्तारत जाते व कुटुंबातील वडीलधाèयांच्या सेवेचा संस्कार पुढेपुढे शेजारधर्म पाळताना शेजाèयांच्या अडीअडचणीत मदतीचा सेवा देण्याचा अनुभव घेत जाते. गरजूंची, गोर गरिबांची सेवा, अपंगांची-रुग्णांची सेवा, आदिवासी बांधवांची सेवा, अनाथ बालकांची सेवाः अशा अनेक सेवाव्रतांना मिळून लाभलेला शब्द म्हणजे ‘समाजसेवाङ्क. याचाच पुढचा टप्पा म्हणजे देशसेवा किंवा राष्ट्रसेवा होय.व्यक्तीच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासामध्ये या सेवाभावाचा मोलाचा वाटा आहे.
सेवा आणि त्यागाचा महिमा सांगणारे शब्द माणसाच्या आयुष्यातील सेवेचे महत्त्व विशद करतात. हे महत्त्व लक्षात घेऊन विद्याथ्र्यांच्या जीवनात विशेषतः शिक्षण व्यवस्थेतूनच सेवा संस्कार व्हावा व त्याचा विद्यार्थी जीवनाबरोबर राष्ट्रालाही उपयोग व्हावा, या हेतूने शिक्षण क्षेत्रात अनेक योजना वेगवेगळ्या स्तरावर राबविल्या जातात. प्राथमिक शाळेच्या पातळीवर समाजसेवेच्या तासापासूनच उच्च शिक्षण क्षेत्रातील ‘राष्ट्रीय सेवा योजनाङ्क या राष्ट्रीय उपक्रमापर्यंंत त्याची व्याप्ती दिसून येते. शैक्षणिक कार्यासोबतच सामाजिक कार्याचे भान असणे आवश्यक आहे. विद्याथ्र्यांनी आपल्या कर्तृत्वाने आपले अस्तित्व निर्माण केले पाहिजे.
पूर्व विदर्भातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ हे एक महत्त्वाचे केंद्र. या विद्यापीठार्तंगत नागपूर,गोंदिया,भंडारा व वर्धा जिल्ह्यांचा समावेश होत असून लाखोंच्या संख्येने विद्यार्थी २०० च्यावर महाविद्यालयातून शिक्षण घेत आहेत. यापैकी काही विद्याथ्र्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेशी आपली नाळ जुळवून घेत वर्षातील १०-१५ दिवस गावखेड्यात जाऊन गावातील राहणीमानात सहभागी होऊन त्या गावाच्या विकासात आपले योगदान असावे, यासाठी व्हाटसअप,फेसबुकसह ट्विटरच्या काळातही मनात qबबवलेली गाठ युवकांच्या बौद्धिक विकासाची जाणीव करून देते. अशाच एका राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचे आयोजन गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगावदेवी येथे करण्यात आले होते. ९ जानेवारी ते १५ जानेवारीपर्यंत चाललेल्या या सात दिवसीय शिबिराने बोंडगावदेवी या गावाचा चेहरामोहराच नव्हे तर श्रमदानाच्या माध्यमातून कधीही शासकीय योजनेतून न होऊ शकणारा जंगलातील दीड ते पावणेदोन किलोमीटरचा रस्ता अवघ्या पाच दिवसात पूर्ण केला. गावातील ३०० एकर शेतीकडे जाण्याचा नवा मार्ग तयार करून दिल्याने १०० शेतकèयांच्या समस्येचा कायम निपटारा झाला. राज्याच्या मुंबई,कोल्हापूर,नागपूर,गोंडवाना,अकोला कृषी विद्यापीठासह इतरही विद्यापीठातून आलेल्या २०० विद्यार्थी विद्यार्थिंनीनी आपल्यात जागविलेल्या स्वयंसेवकाच्या भूमिकेमुळेच या गावाचा चेहरामोहरा बदलला गेला आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या पहिल्या २०१४-१५ या वर्षातील महाविद्यालय शिबिरापासून,२०१५-१६ च्या विद्यापीठ शिबिर आणि यावर्षीच्या राज्यस्तरीय शिबिराच्या माध्यमातून सुमारे ५०-६० लाख रुपये किमतीचे कामे श्रमदानाच्या माध्यमातून करून शासनाच्या पैशाची बचत करण्यात आली आहे.
खासदार ग्राम असो की आमदार दत्तक ग्राम असो याठिकाणी होऊ घातलेला विकास हा शासकीय निधीतून होतो. परंतु, बोंडगावदेवीमध्ये गेल्या तीन वर्षात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ६० लाखाची कामे श्रमदानातून करण्यात आली. सोबतच गावातील स्वच्छतेकडे सुद्धा विशेष लक्ष देण्यासोबतच गावातील युवकांमध्ये रक्तदानाप्रती जनजागृती मोहीम सुद्धा राबविण्यात आल्याची माहिती एस.एस.महाविद्यालयाचे रासेयो प्रमुख प्रा.राजेश चांडक व प्रा.शरद मेश्राम यांनी दिली. सुरवातीच्या वर्षात अनेक वर्षापासून केरकचèयामुळे नाहीसा झालेल्या सांडपाणीवाहून जाणाèया नालीचा शोध घेऊन त्या नालीतून १५ ते २० ट्रॅक्टर केरकचरा काढून नाली सुरळीत करण्यात आली. गावकèयांना सुद्धा या नालीचा अंदाज नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे चांडक सांगतात.
आपल्या मदतीने मृत्युशय्येवर असलेल्या एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या चेहèयावर नवसंजीवनीचे हास्य फुलण्याचे भाग्य लाभावे, यासाठी रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. हा उद्दात हेतू समोर ठेवून शिबिरात सहभागी झालेल्या ८५ रासेयो स्वयंसेवकांनी रक्तदान केले. याच शिबिरात राजेश चांडक यांनी ६० व्यावेळी रक्तदान करून युवकांमध्ये नवचैतन्यही निर्माण केले. याच विद्याथ्र्यांच्या सोबतीने बंधारा तयार करून नाल्यातील पाणी अडविल्याने मुक्या जनावरांसाठी उन्हाळ्यात पाण्याची सोय केली.राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य उद्दिष्ट महाविद्यालयीन विद्याथ्र्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करून त्यांना सामाजिक कार्याचा सराव करण्यास वाव देणे, हे आहे. महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करणे, क्रीडांगणे तयार करणे, ग्रामीण विभागातील रस्ते बांधणे, प्रौढ शिक्षण, गलिच्छ वस्त्यांची सफाई, प्रथमोपचार, नागरी संरक्षण इ. कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला होता. नक्षलप्रभावीत जिल्ह्यात येण्याचा योग मला या शिबिराचा माध्यमातून मिळाला.खेडेगावातील संस्कार व संस्कृती कशी असते हे जवळून बघण्याचा योगही आल्याची भावना मुंबईची मीना जाधव व कोल्हापूरच्या संजीवनी qशदे या रासेयोच्या विद्यार्थिनींनी व्यक्त केली. त्या ग्रामोन्नतीकरिता युवा शक्ती या संकल्पनेवर आयोजित शिबिरात सहभागी झाल्या होत्या. गोंदियाच्या बाबतीत त्यांच्या मनात असलेले आधीची भीती मात्र या शिबिरात सहभागी झाल्यानंतर दूर झाली होती. या गावात असताना आम्हाला कधी आम्ही आमच्या कुटुंबापासून लांब आहोत, असे वाटलेच नाही. या गावातील कुटुंबांकडून मिळालेले प्रेम व संस्कार,वात्सल्य हे आपल्याच आईबाबासारखे असते, हे सुद्धा कळल्याच्या भावना व्यक्त केल्या. प्रत्येक घरासमोर सकाळी होणारा शेणाचा सडा,अंगणातील तुळशी सायंकाळी प्रत्येक घरातून निघणारा भक्तीसुंगध हा आम्हाला आल्हाददायक वाटायचा. शहरातील वातावरणापेक्षा गावखेड्यातील वातावरणच निरोगी व आनंददायी असते, हे रासेयो शिबिराच्या माध्यमातून अनुभवता आल्याची भावनाही व्यक्त करीत आपल्या जीवनात काहीतरी सार्थक कार्य केल्याचा अभिमान असल्याचे त्यांच्या चेहèयावरून जाणवत होते.
ग्रामीण भागातील परिसराची सुधारणा, आरोग्य तथा कुटुंबनियोजन हे कार्यक्रम श्रमदानाच्या माध्यमातून हाती घेण्यात आले. त्याचप्रमाणे उत्पादनविषयक कार्यक्रम, आणीबाणी, प्रौढ शिक्षण, मनोरंजन, बालकांसाठी उपक्रम इ. कामेही सुरू करण्यात आली. योजनेकरिता महाविद्यालयाची निवड करण्याचे काही निकष आहेत. ज्या संस्थेत समाजकार्य करण्याची प्रथा आहे व ज्या संस्था ग्रामीण विभागातील विकासकार्य करण्याच्या दृष्टीने ग्रामीण विभागाजवळ आहेत, अशी महाविद्यालये या योजनेसाठी निवडली जातात. प्रत्येक महाविद्यालयातून २०० पर्यंत विद्याथ्र्यांची निवड करण्यात येते. प्रत्येक विद्याथ्र्याला वर्षातून १२० तास काम करावे लागते. प्रत्येक महाविद्यालयास कार्यक्रमाची निवड करण्याचे स्वातंत्र्य असते.
सतत तीन वर्षापासून बोडगावदेवीत हे शिबिर होत आहे. यासाठी प्रा.राजेश चांडक,प्रा.शरद मेश्राम रासेयो प्रमुख म्हणून काम करतात. नागपूर विद्यापीठ एका विद्याथ्र्यामागे ४५० रुपये सात दिवस खर्च करते, हे अत्यल्प आहे. शिबिरातील विद्याथ्र्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुविधा पुरविल्या पाहिजे. शासनाने आणि विद्यापीठ प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. श्रमदानाच्या माध्यमातून गावविकासाला गती देणे शक्य आहे. शासनाला जे शक्य होत नाही, ते अशा शिबिराच्या माध्यमातून होत असल्याने देशाच्या विकासात राष्ट्रीय विकास अशा शिबिरांचे महत्त्व आहे. त्याच्या बळकटीकरणावर शासन आणि समाजाने भर देणे यामुळे अगत्याचे ठरते.