धारणी तालुक्यातील 163 गावे प्रकाशमय

0
24

132 केव्ही नेपानगर-धारणी आंतरराज्यीय एकल परिपथ वाहिनी सुरू
अमरावती, berartimes.com दि.11 : धारणी येथे 132 केव्ही वीजेचे उपकेंद्र व या उपकेंद्राला विज पुरवठा करण्याकरीता लागणारी 132 केव्ही नेपानगर-धारणी आंतरराज्यीय एकल परिपथ वाहिनी 60 किमी विद्युत वाहीनी कालपासुन सुरू झाली. मेळघाटच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा या प्रकल्पामुळे धारणी तालुक्यातील एकुण 163 गावे व एकुण 11063 घरगुती वीज ग्राहकांना व 3181 कृषी पंपाना वीज उपलब्ध होणार आहे. यामुळे मेळघाट परिसरातील विजेचा काळोख दुर होणार आहे. 132 केव्ही धारणी उपकेंद्र कार्यान्वीत झाल्याने हा प्रकल्प धारणी परिसरातील विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.
धारणी उपकेंद्र यशस्वी पुर्ण करण्याकरीता नेहा कन्स्ट्रकशंन नागपूर व प्रतिभा इलेक्टीकल्स पुणे या एजन्सीनी काम केले.महाराष्ट्र पारेषण कंपनीचे मुख्य अंभियता सुरेश पाटील, अतीउच्च दाब प्रकल्प अधिक्षक अभियंता वंदनकुमार मेंढे, अधिक्षक अभियंता चाचणी मंडळ रुपेश फरकाडे, अधिक्षक अभियंता स्थापत्य अविनाश कसबेकर, कार्यकारी अभियंता प्रमोद पखाले, कार्यकारी अभियंता प्रकाश किनगावकर,कार्यकारी अभियंता विकास दलाल,अतिरिक्त कार्यकारी अभियंता विशाल इंगळे यांनी परीश्रम घेतले.