मोबाइलवरून आॅर्डर : लवकरच नवीन सुविधा

0
6

मुंबई : मोबाइल तिकीट सेवा रेल्वेकडून मुंबईत सुरू केल्यावर आता मोबाइलवरून आवडीचे खाद्यपदार्थ मिळवण्याची सुविधाही लवकरच सुरू केली जाणार आहे. देशभरातील स्थानकांवर ही सुविधा सुरू करण्याचा प्रयत्न असेल, अशी घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबईत केली. दादर येथील मोबाइल तिकीट सेवेचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते.

रेल्वेमंत्री म्हणाले की, मोबाइल तिकीट सेवा ही चांगली सेवा आहे. प्रवाशांनी त्याचा लाभ घेणे आवश्यक आहे. अशा अनेक नवीन सुविधा आम्ही आणत असून, पुढील काळात मोबाइलवरून आपल्या आवडीचे खाद्यपदार्थ मिळवण्याची सोय उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्नशील आहोत.

प्रवासात एखाद्या व्यक्तीला आपल्या आवडीच्या किंवा जवळपासच्या प्रसिद्ध हॉटेल किंवा दुकानातून खाद्यपदार्थ मागवता येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रवाशांच्या तक्रारींबाबत प्रभू म्हणाले की, प्रवाशांकडून अनेक तक्रारी येतात. मात्र त्यांचे निवारणही केले जात नाही. तसेच निवारण झाले की नाही याची माहितीही मिळत नाही. प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी दोन ते तीन महिन्यांत देशभर एक नवीन हेल्पलाइन तयार केली जाणार आहे. तसेच तक्रारींसाठी वेब पोर्टल सुरू करण्यात येणार असून, त्यासंबंधी काम सुरू असल्याचे प्रभू यांनी सांगितले.

बेस किचन

लांब पल्ल्याच्या प्रवासात खाद्यपदार्थांचा दर्जा हा चांगलाच असतो असे नाही आणि हा दर्जा सुधारावा यासाठी ५0 ते ६0 ठिकाणी बेस किचन तयार करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला असल्याचेही रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.

मोबाइल तिकीट सेवेच्या शुभारंभानंतर प्रभू म्हणाले…
च्अस्वच्छता दूर करण्यासाठी लवकरच दिल्लीतून अधिसूचना जारी करण्यात येणार आहे आणि यातून स्वच्छतेसाठी उपाययोजना करण्यात येतील. यासाठी शहरातील पालिकेकडूनही सहकार्य मिळाले पाहिजे.

च्रेल्वेच्या जमिनी न विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्पन्नासाठी त्या भाड्याने देण्यात येणार आहेत.

च्मालवाहतुकीतून उत्पन्न वाढविले पाहिजे. यासाठी पुढे प्रयत्न करणार आहोत.च्रेल्वेच्या कायद्यात बदल करून स्टेशन मास्तरांंनाही जादा अधिकार देता येतात का यासाठी प्रयत्नशील आहोत.च्स्थानकांवर मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबविण्यासाठी देशभरातील ५0 स्थानकांची निवड सुरुवातीला करण्यात आली असून, त्यावरील स्वच्छतेची कामे खासगी कंत्राटदारांना देण्यात येणार आहेत. यात महाराष्ट्रातील ५ स्थानकांचा समावेश आहे.25000 किलोमीटरपर्यंत रेल्वेचा विस्तार होणे गरजेचे आहे. यासाठी निधीची गरज आहे.