समाधान शिबिरानंतरही जनता दरबारात जनतेच्या तक्रारी

0
20

गोंदिया,दि.२८-गेल्याच आठवड्यात राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी समाधान शिबिराच्या माध्यमातून जनतेच्या समस्या निकाली काढण्याचा प्रयत्न केला.त्याआधी सुध्दा त्यांनी प्रयत्न केले होते.परंतु खासदार नाना पटोले यांनी आपला जनता दरबार सुरु करताच आपल्या शिबिराची हवा निघू नये यासाठी त्यांनी अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी येथील समाधान शिबिर आधी घेऊन काही समस्या निकाली काढण्याचा प्रयत्न केला.परंतु २८ फेबुवारीला जेव्हा अर्जुनीमोरगावात खासदाराच्या जनता दरबाराला आलेल्या जनतेच्या संख्येकडे बघून पालकमंत्र्याचा समाधान शिबिर हा असमाधानिच होता की काय असे वाटू लागले.जनता ज्यापध्दतीने आपल्या तक्रारी खासदाराच्या समक्ष मांडत होती त्यावरुन त्यांचे समाधान झालेच नाही हे या दरबारातून नक्की झाले.या दरबाराला मात्र जिल्हास्तरावरून जिल्हाधिकारी,सीईओ यांनी जाणे टाळले.उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर,उपविभागीय अधिकारी परुळेकर,अर्जुनीमोरचे तहसिलदार बोंबार्डे,बीडीओ एन.आर.जमईवार,शिक्षणाधिकारी उल्हास नरड,सभापती अरqवद शिवणकर,माजी आमदार दयाराम कापगते यांच्यासह आजी माजी पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.खासदार पटोलेचा दरबार सुरु होताच लेखी स्वरुपात पहिल्याच अर्धा तासात ३३-४० तक्रारी आल्या,त्यानंतरही तक्रारी सुरुच होत्या.खासदारांनी या सर्व तक्रारीचे निराकारण करण्याच्या सुचना देत अधिकाèयांना योजनेची अमलबजावणी करण्यात हयगय केल्यास कारवाईचा इशारा सुध्दा दिला.