मातृभाषेचा मनातून सन्मान व्हावा : बहेकार

0
29

गोंदिया दि. 28–: अलिकडे इंग्रजी शिक्षणाला डोक्यावर घेतले जात असून मातृभाषेचा विसर पडत आहे. जागतिक ज्ञानासाठी इंग्रजी आणि इतर भाषा आवश्यक असल्यातरी ज्या मातृभाषेने आपल्यावर संस्कार रूजविले. त्या मातृभाषेचा सन्मान करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. केवळ गौरव दिवस साजरा करून चालणार नाही. तर प्रत्येकाने मातृभाषेचा मनातून सन्मान करावा. मराठी शाळा वाचतील तरच मराठी सुरक्षीत राहील. असे मत चंद्रकुमार बहेकार यांनी व्यक्त केले. महाराष्टÑ राज्य पर्यावरण महामंडळाच्या गोंदिया आगारात सुप्रसिद्ध मराठी कवी व नाटककार विष्णू वामन शिरवाडकर जयंतीनिमित्त मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक इंगोले उपस्थित होते. यावेळी शिरवाडकरांच्या तैलचित्राचे पुजन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. संचालन आगार प्रमुख संजना पटले यांनी केले तर आभार झोडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महामंडळाच्या कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.