मराठवाड्यात १७ ठिकाणी प्राप्तीकर विभागाचे छापे

0
11

औरंगाबाद दि.०5मार्च: नोटाबंदीच्या काळात बँकेत अधिक पैसे जमा करणाऱ्यांविरुद्ध प्राप्तीकर विभागाने बडगा उगारला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डने (सीबीडीटी) मराठवाड्यात अशा ४०० लोकांची यादी तयार असून त्याआधारे प्राप्तीकर विभागाने चार दिवसांपासून औरंगाबादसह वैजापूर, जालना, बीड व लातूर येथील १७ ठिकाणी छापे टाकून सुमारे १० कोटी रुपयांपेक्षा अधिक बेहिशोबी रक्कम उघड केली आहे.

नोटाबंदीच्या काळात बचत खात्यांमध्ये अडीच लाख किंवा त्यापेक्षा अधिक व्यवहार झालेले खातेधारक तसेच चालू खात्यांमध्ये १२ लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम जमा केलेल्यांची माहिती बँकांद्वारे प्राप्तीकर विभागाला प्राप्त झाली आहे. त्यावरून प्राप्तीकर विभागाने बजावलेल्या नोटिशीला उत्तर न देणाऱ्यांविरुद्ध कारवाईस सुरुवात झाली आहे.