क्रियाशील सदस्यांनाच मिळणार आत्ता मतदानाचा हक्का

0
6

भंडारा अर्बन बँक सभासदासांठी प्रशिक्षणाचे आयोजन
गोंदिया,दि.१८(berartimes.com)-दि.भंडारा अर्बन को अॉफ बँक लि.भंडाराच्यावतीने गोंदिया,भंडारा,चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यात असलेल्या सभासदाकरीता सहकार कायद्यात शासनाने केलेल्या तरतुदीनुसार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्यानुसार गोंदियात शुक्रवार(दि.१७)हे प्रशिक्षण जैन कुशल भवन येथे पार पडले.या प्रशिक्षणात मार्गदर्शन करतांना जे सदस्य यापुढे बँकेचे क्रियाशील सदस्य म्हणून राहणार नाही,त्यांना बँकेच्या निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत सहभागी होता येणार नसून ते फक्त नामधारी सदस्य राहणार अशी माहिती प्रशिक्षणक मोरे यांनी दिली.तसेच प्रत्येक सभासदाने आपण ज्या बँकेचे सदस्य आहोत त्या बँकेच्या कार्यात सहभागी होणे आवश्यक असल्याची माहिती दिली.
प्रशिक्षण शिबिराची सुरवात सरस्वतीच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन करण्यात आली.यावेळी मंचावर बँकेचे अध्यक्ष महेश जैन,उपाध्यक्ष हिरालाल भांगळकर,सचांलक विलास काटेकाये,नाना पंचबुध्दे,श्री डोरले,श्री शहारे,श्री खटीक,बँकेचे व्यवस्थापक हरिष मदान,भगत ठकरांनी आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बँकेचे अध्यक्ष जैन म्हणाले की,बँकेचे ५० हजारावर सदस्य आहेत.परंतु क्रियाशील सदस्यांची संख्या कमी आहे.त्यामुळे क्रियाशील सदस्य होण्यासाठी किमान ५ हजाराचे डिपाजिट qकवा ५० हजारापर्यंतच कर्ज घेऊन बँकेच्या व्यवहारात सहभागी होऊन क्रियाशील सदस्य होता येते.यासाठी प्रत्येक सदस्यांने आर्थिक व्यवहार करुन बँकेच्या भरभराटीस सहकार्य करावे.केंद्र सरकारने केलेल्या ९७ व्या घटनादुरुस्तीनुसार या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून सभासदांना कर्ज स्वरुपात देण्यासाठी ७०-८० कोटी रुपयाचा निधी आजही बँकेत उपलब्ध असल्याची माहिती दिली.प्रशिक्षक मोरे यांनी सांगितले की,सहकाराची सुरवात सर्वात आधी इंग्लडमध्ये १८४४ मध्ये झाली.त्यानंतर त्याचे हळूहळू विस्तार व कायद्यात बदल होत गेले.महाराष्ट्रात १९६० महाराष्ट्र सहकार कायद्यानुसार काम चालत असून त्यात वेळोवेळी बदल करुन सर्वांना कसे सामावून घेता येईल यावर सरकारने लक्ष केंद्रित केल्याची माहिती दिली.तर बँकेला बँकेचा परवाना हा रिझव्र्ह बँकेच्या अटीशर्ती पुर्ण केल्यानंतरच दिला जातो हे सुध्दा सांगितले.संचालन व आभार गोंदिया शाखेचे व्यवस्थापक आर.व्ही मेश्राम व तिरोडा शाखेचे व्यवस्थापक चाचेरे यांनी केले.प्रशिक्षणाला १०० वर सदस्य सहभागी झाले होते.