वर्षभरात नागपूर विमानतळावरून ८१५0 उड्डाणे

0
11

नागपूर ,दि.18 (berartimes.com): मिहान इंडिया लि.कडून माहितीच्या अधिकाराअंतर्गत प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २0१६ या वर्षभरात नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकूण ८१५0 विमान (शेड्युल-नॉन शेड्युल), हेलिकॉप्टर्स आणि खाजगी विमानांचे लॅण्डिंग आणि उड्डाण झाले. याद्वारे मिहान इंडिया लि.ला ३२,९0,३४,४२९ रुपयाचा महसूल प्राप्त झाला आहे.३३ कोटी रुपयांचा महसूल प्राप्तसाडेनऊ लाख लोकांनी केला विमान प्रवासविविध विमानांच्या लॅण्डिंगमधून ११,६७,६७,0४५ रुपये, पार्किंगमधून ८,४२,३५९ रुपये, पीएसएफमधून १९,३0,४१,९९0 रुपये आणि जाहिरातीतून १,८३,८३,0३५ रुपये महसूल प्राप्त झाला आहे.गेल्या वर्षभरात विमानतळावर एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नसल्याचे सांगण्यात आले आहे.
विमानतळाच्या संरक्षणासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल केंद्र शासनाकडून तैनात करण्यात आले असून वर्षभरात विमानतळावर जंगली प्राणी आल्याचे किंवा त्याद्वारे उड्डाणाला अडथळा निर्माण झाल्याचे वा त्यात प्राणी मरण पावल्याची एकही घटना घडलेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या काळात ९,३१,५२३ प्रवाशांनी नागपूरबाहेर विमानाद्वारे प्रवास केल्याचेही सांगण्यात आले आहे. परंतु, वर्षभरात स्मगल्ड माल घेऊन जाणार्‍या-येणार्‍यांची व त्या मालाची माहिती दर्शवण्यास तांत्रिक कारणामुळे असर्मथता दर्शवण्यात आली असून रद्द झालेल्या उड्डाणांची किंवा लॅण्डिंगची माहिती वा उशिराने लॅण्ड व उड्डाण केलेल्या विमानांची माहिती संबंधित विमान कंपन्यांनाच विचारण्याची विनंती मिहान इं. लि.द्वारे करण्यात आली आहे.अभय कोलारकर यांनी मिहान इंडिया लि.कडे विमानतळावरील आकडेवारी माहिती अधिकाराअंतर्गत मागवली. त्यात त्यांनी एकूण ११ प्रश्ने उपस्थित केले असून, त्यातील तीन प्रश्नांची उत्तरे मिहान इं.लि.ला देता आलेली नाहीत. गेल्या वर्षभरात विमानतळावर ६२५ निश्‍चित पंख असलेली खाजगी विमाने (प्रायव्हेट एयरक्रॉफ्ट) आणि ४२६ हेलिकॉप्टर्स उतरली आणि त्यातून मिहानला ४९,३६,७४५ रुपये महसूल प्राप्त झाला आहे.