तुमसर शहरात शहिद मंगेश बालपांडे चौक, नामकरण संपन्न

0
21

तुमसर : अजूनही देशभक्तीची भावना देशात जागृत आहे. तुमसर येथे शहीद मंगेश बालपांडे यांच्या वार्डातील एका चौकाचे नामकरण शहरवासीयांनी वीर “शहीद मंगेश बालपांडे” असे नामकरण केले.
तुमसर वासीयांनी देशभक्तिचा संदेश संपूर्ण जनतेला देत हे नामकरण केले. कार्यक्रमाची जबाबदारी शिवसेनेच्या तुमसर शहर शाखेने पार पाडली. या नामकरणाच्या कार्यक्रमात प्रामुख्याने शहीद मंगेश बालपांडे यांची आई व सोबत पत्नी, लहान मुलगा व मुलगी उपस्थित होते. या चौकाचे नामकरण फलकाचे अनावरण सगळ्यांच्या प्रेरणेने आईच्या शुभहस्ते पार पाडण्यात आले. या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी व तुमसर शहरवासी प्रामुख्याने उपस्थित होते. आईच्या शुभहस्ते अनावरण होत असतांना सगळ्यांच्या डोळ्यात अश्रु होते व जोर जोरात शहीद मंगेश बालपांडे “अमर रहे” “अमर रहे” अशा घोषणा होत होत्या. तेव्हा परिसर गाजुन गेला व आजही शहीद मंगेश बालपांडे आमच्यात आहे, अश्या भावना प्रत्येकांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. या फलक अनावरणाच्या कार्यक्रमात तहसील कार्यालयाचे अधिकारी सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते.