उष्माघातापासून बचावासाठीकाळजी घ्या- आरोग्य विभाग

0
23

नांदेड – डोक्यावर सूर्य आग ओकत असल्याने देशात उष्णतेची लाट आलेली आहे. यामुळे उष्माघाताच्या रुग्णाच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. अशा वेळी नागरिकांनी विशेषत: जेष्ठव्यक्ती, लहान बालके, गरोदर माता व उन्हात काम करणाऱ्या व्यक्तीनीस्वत:ची काळजी घ्यावी. उष्माघात पासून बचाव करण्यासाठी विविध उपाय योजना कराव्यात, असे आवाहन आरोग्य विभाग नांदेड यांचेकडून करण्यात आले आहे.
उष्माघातपासून बचावासाठीच्या उपाय योजना पुढील प्रमाणे
उष्णतेमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी असे करा

*भरपूर पाणी पिणे
*भरपूर थंड पेय पिणे. उदा. ताक, आंब्याचे पन्हे, नारळ पाणी
*आवश्यक असल्याशिवाय उन्हात जाण्याचे टाळा
*फिकट रंगाचे कपडे घालणे
*थंड जागेत / वातावरणात राहणे.·भर उन्हात म्हणजे साधारणता: दुपारी१२ ते संध्याकाळी ५ पर्यंत काम करायचे टाळण

उष्माघाताची लक्षणे :-
*अस्वस्थपणा
*थकवा
*शरीर तापणे
*अशक्तपना
*अंगदुखी, डोकेदुखी मळमळ

उष्माघाताची लक्षणे आढळल्यास असे करा :
*थंडगार पाण्याने आंघोळ करणे(डोक्यावरून गार पाण्याने आंघोळ करून, तापलेले शरीर थंड होण्यास मदत होईल)
*थंड जागेत / वातावरणात आराम करणे
*परिश्रमाचे काम न करणे
*भरपूर थंड पाणी / पेय पिणे व मनपा आरोग्य केंद्रात किवा जिल्हा रुग्णालयास त्वरित ओषधपचार करवून घेणे.
108 या टोल फ्री क्रमांकावरसंपर्क साधवा

हे करू नका:-

*दुपारी 12 ते 3 उन्हात फिरु नका
*मद्यसेवन, चहा, कॉफी आणि कार्बोनेटयुक्त सॅाफ्ट ड्रिंक्स घेऊ नका. त्यामुळे डीहाइडेट् होते
*·उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नका.

हे करा :-

*.तहान नसल्यास ही पुरेसे पाणी प्या.
*.बाहेर जाताना गॅागल, छत्री, टोपी, बूट किवा चप्पल वापरा.
*.प्रवास करताना सोबत पाणी घ्या.
*.आपले घर थंड ठेवा, पडदे सनशेड बसावा.
*.रात्री खिडक्या उघडया ठेवा.
*.अशक्त, कमजोरी असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.उष्माघाताच्या उपचारासाठी गुरुगोबिंदसिंघजी स्मारक शासकीय जिल्हा रुग्णालय नांदेड, डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,महापालिकेची रुग्णालये याठिकाणी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.