नांदेड येथे जागतिक ग्राहक दिनाचे आयोजन आज

0
33

नांदेड दि.31 -ग्राहकांच्या हक्कांची व ग्राहक संरक्षण कायद्याची जनतेत जनजागृती होण्याच्या उद्देशाने आज शुक्रवारी (ता.31) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे सकाळी 10 वा. जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या अध्यक्ष सौ. स्मिता कुलकर्णी राहतील. प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य डॉ. बा. दा. जोशी राहतील. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जि. ग्रा. सं. प. सदस्य आर. एस. कमटलवार हे राहतील.नागरिक व ग्राहकांनी शुक्रवार 31 मार्च 2017 रोजी जागतिकग्राहक दिनाच्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे सकाळी 10 वा. उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.