विद्यापीठाचा 155 कोटीचा अर्थसंकल्प अधिसभेत मंजुर

0
11

,
54.69 कोटींची तुट, विद्यार्थी केंद्रात अर्थसंकल्प—-कुलगुरु

अमरावती- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा 2017-18 आर्थिकवर्षाचा अर्थसंकल्प आज संपन्न झालेल्या अधिसभेत मान्य करण्यात आला. कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या अधिसभेत विद्यापीठाच्या 154.90 कोटी रुपयांच्या अनुदान पत्रकास मान्यता प्रदान करण्यात आली.  100.21 कोटी रुपयांची प्राप्ती असून 154.90 कोटी रुपयांच्या खर्चाचा अंदाज करण्यात आला आहे. सभेचे सचिव म्हणून कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांनी काम पाहिले.
 परिरक्षण, विकास व स्वतंत्र प्रकल्प, योजना किंवा सहयोग कार्यक्रम अनुदाने अशा तीन भागामध्ये अर्थसंकल्प असून परिरक्षणामध्ये (प्राप्ती) वेतन व भत्ते 46.29 कोटी 97 हजार, परीक्षा शुल्क 33 कोटी,  शैक्षणिक विभागांकडून शुल्क 1.98 कोटी 93 हजार, महाविद्यालयांकडून प्राप्त शुल्क 1.54 कोटी 15 हजार व इतर प्राप्ती 9.45 कोटी 36 हजार एवढ¬ा प्राप्तीचा अंदाज करण्यात आला आहे.  विकास कामातंर्गत 4.15 कोटी 29 हजार, स्वतंत्र प्रकल्प अथवा योजना आणि सहयोग कार्यक्रम अनुदाने अंतर्गत 1.43 कोटी 81 हजार अनुदान प्राप्तीचा अंदाज करण्यात आला आहे.
    खर्चामध्ये वेतन व भत्त्यांवर 46.29 कोटी 97 हजार, परीक्षा 28.83 कोटी, शैक्षणिक विभाग 1.98 कोटी 3 हजार, विद्यापीठ ग्रंथालय 89.10 लक्ष, शारीरिक शिक्षण व रंजन मंडळ 2.87 कोटी 91 हजार, इतर खर्चामध्ये 26.2 कोटी 63 हजार एवढ¬ा खर्चासाठी तरतुद करण्यात आली आहे.  विकास कामांतर्गत 41.24 कोटी 9 हजार, स्वतंत्र प्रकल्प अथवा योजना आणि सहयोग कार्यक्रम अनुदाने अर्थसंकल्पीय वर्षात 1.43 कोटी 81 हजार खर्चाचा अंदाज करण्यात आला आहे.

    अंदाज पत्रकाची ठळक वैशिष्टये

    -स्वच्छ भारत – स्वस्थ भारत योजनेंतर्गत विविध उपक्रमांसाठी 1.50 लक्ष.
    -बेस्ट प्रॅक्टीसेस अंतर्गत परिसंवाद/कार्यशाळा/चर्चासत्र आणि इतर कार्यक्रमांसाठी 10 लक्ष.
    -परीक्षा सुधारणासाठी 4.50 कोटी.
    -जुन्या दस्तऐवजांचे डिजीटायझेशन करण्यासाठी 75 लक्ष.
    -विद्यार्थी सुरक्षा विमा अंतर्गत 25 लक्ष.
    -ग्रंथालयीन सुविधांसाठी 1.86 कोटी 48 हजार.
    -बुलढाण्यातील आदर्श पदवी महाविद्यालय आवर्ती खर्चासाठी 39.83 लक्ष तर अनावर्ती खर्चासाठी 12 लक्ष.
    -संत गाडगे बाबा विद्याधन योजनेंतर्गत 5 लक्ष.
    -विविध कार्यक्रम, शिबीर आयोजनासाठी आपत्कालीन निधी 30 लक्ष.
    -संत गाडगे बाबा एस.टी. बस पास योजनंेर्गत 5 लक्ष.
    -संत गाडगे बाबा विद्यार्थी शिक्षण संरक्षण योजनेंतर्गत 5 लक्ष.
    -संत गाडगे बाबा शुध्द पेयजल योजनेसाठी 8 लक्ष.
    -स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राकरिता 30 लक्ष.
    -अपारंपारिक उर्जा व जल स्त्रोत निर्माण करण्यासाठी 1 कोटी.
वित्त व लेखा अधिकारी डॉ. शशीकांत आस्वले यांनी 2015-16 चे वार्षिक लेखे व अंकेक्षण अहवाल आणि 2017-18 चा अर्थसंकल्प अधिसभेत मांडला.  2015-16 चा वार्षिक अहवाल डॉ. मनोज तायडे यांनी सादर केला.अंदाजपत्रकावर डॉ. एफ.सी. रघुवंशी, डॉ. विजय चौबे, डॉ. जे.डी. वडते डॉ. श्रीकांत पाटील, डॉ. अविनाश असनारे, डॉ.मनोज तायडे, श्री.अजय देशमुख, श्री.अजय लहाने, यांनी सूचना मांडल्यात. बुलढाणा येथील आदर्श पदवी महाविद्यालयासाठी शासनाकडून 6 हेक्टर जागा मिळाल्याबद्दल डॉ. रघुवंशी यांनी कुलगुरुंचे सभेत अभिनंदन केले.या महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी अंदाजपत्रकात 4.52 कोटी 83 हजाराची तरतुद करण्यात आली आहे.  
    अर्थसंकल्पावर बोलतांना कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर म्हणाले, अर्थसंकल्पात विद्यार्थी केंद्र योजनेचा समावेश करण्यात आला असून परीक्षेचे निकाल वेळेवर लागण्याकरिता परीक्षा सुधारणा या करिता तरतुद करण्यात आली आहे.  वाणिज्य व व्यवस्थापन, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र व इतिहास हे चार नवीन शैक्षणिक विभाग सुरु करण्याकरिता अंदाजपत्रकात तरतुद करण्यात येत आहे. नवीन कायद्यानुसार ज्या ज्या तरतुदी कराव्या लागणार आहेत, त्या करण्याकरिता अधिसभेने कुलगुरुंना अधिकार प्रदान करण्याचा निर्णय घेतला.  
    वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने सुरु झालेल्या अधिसभेची सांगता कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांच्या आभारप्रदर्शनाने झाली.