उद्धव ठाकरे एनडीएच्या बैठकीला दिल्लीला जाणार

0
9

मुंबई दि. 10 – : राजधानी दिल्लीत उद्या (सोमवार) एनडीए पक्षांची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला शिवसेना उद्धव ठाकरे स्वत: उपस्थित राहणार हे जवळपास निश्चित असल्याची माहिती आहे.दिल्लीतल्या प्रवासी भारतीय भवन इथे संध्याकाळी साडे सहा वाजता ही बैठक होणार आहे. निमित्त यूपीच्या विजयाचं असलं तरी राष्ट्रपती निवडणुकीची चर्चा होणार आहे. त्यामुळे ‘मातोश्री’ची परंपरा खंडीत होणार आहे. कारण राष्ट्रपती निवडणुकीचा इतिहास पाहिला तर शिवसेनेचं समर्थन मागण्यासाठी आतापर्यंत सर्व पक्ष ‘मातोश्री’वर यायचे, पण शिवसेना पहिल्यांदाच राष्ट्रपती निवडणुकीबाबत दिल्लीत चर्चा करणार आहे.