मंत्री, अधिका-यांच्या गाड्यांवरुन हटणार लाल दिवा

0
21
नवी दिल्ली, दि. 19 – मंत्री आणि अधिका-यांच्या गाड्यांवरील लाल दिव्यांबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाने महत्त्वापूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या 1 मेपासून मंत्री आणि अधिका-यांच्या गाड्यांवरील लाल दिवे हद्दपार करण्यात येणार आहेत. केवळ काही महत्त्वाच्या श्रेणीतील मंत्री आणि अधिका-यांना या निर्णयातून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

यांच्या गाड्यांवर लाल दिवा कायम
– राष्ट्रपती
– उपराष्ट्रपती
– पंतप्रधान
– राज्यपाल
– राज्याचे मुख्यमंत्री
दरम्यान, उत्तर  प्रदेशाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी सर्वांत प्रथम आपल्या सर्व मंत्र्यांना व्हीआयपी संस्कृतीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. तसेच कोणत्याही मंत्र्याने आपल्या वाहनावर लाल दिवा न लावण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या होत्या. त्यांच्या पाठोपाठ दोन दिवसांनंतर  पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनीही महत्त्वाच्या श्रेणीतील नेते तसंच अधिका-यांचा अपवाद वगळता आपल्या मंत्र्यांना लाल दिव्यांच्या गाडीचा वापर न करण्याची सूचना दिली होती.  त्यांच्या या सूचनेनंतर मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांच्या वाहनांवरील लाल दिवे काढण्यात आले.